Shravan Shukravar Jivati Vrat 2025 आपल्या मुलांच्या रक्षणासाठी आज करा जिवती पूजन

शुक्रवार, 25 जुलै 2025 (11:21 IST)
श्रावण महिना हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो आणि या महिन्यातील प्रत्येक शुक्रवारी जिवती पूजनाला विशेष महत्त्व आहे. जिवती पूजन हे विशेषतः मुलांच्या रक्षण, दीर्घायुष्य आणि मंगल कामनेसाठी मातृशक्तींद्वारे केले जाते. हे व्रत प्रामुख्याने महाराष्ट्रात आणि काही इतर भागांमध्ये पाळले जाते. जिवती ही मुख्यतः लहान मुलांची जीवनदायिनी देवी आहे. जिवती पूजनाचे हे व्रत श्रावण महिन्यात दर शुक्रवारी करतात. जिवती या व्रताची देवता आहे . ही लहान मुलांचे रक्षण करणारी आहे.
 
श्रावणाच्या पहिल्या शुक्रवारी भिंतीवर गंधाने जिवतीचे चित्र काढून स्त्रिया त्याची पूजा करतात. हल्लीच्या काळात छापील चित्रांचीही पूजा केली जाते.घरामधील सर्व लहान मुलांचे औक्षण करून जिवतीमातेने त्यांचे रक्षण करावे अशी तिला मनोभावे प्रार्थना करायची अशी प्रथा आहे.
ALSO READ: Jivati Pujan 2025 श्रावणात जिवती पूजन का केले जाते? संपूर्ण माहिती जाणून घ्या
श्रावणी शुक्रवार व जिवती पुजन हे अनेक घराण्याचा कुलधर्म किंवा कुळाचार आहे. श्रावणातल्या शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीची आराधना करून सवाष्णींना भोजन व हळदी-कुंकू, फुले, पाने व सुपारीसह दक्षीणा देऊन त्यांचा सत्कार केला जातो. श्रावणातल्या चारी शुक्रवारी जिवतीची पुजा करतात. ही पुजा संतती रक्षणार्थ मानली जाते.
ALSO READ: शुक्रवार जिवती आईची कहाणी
जिवतीचा कागद श्रावण महिन्याच्या सुरुवातीस जो वार (उदा. मंगळवार, बुधवार, शुक्रवार, शनिवार) येईल त्या दिवशी देव्हा-याच्या भिंतीवर लावावा. या प्रतिमेत नरसिंह, कालियामर्दन करणारा श्रीकृष्ण, जरा-जिवंतिका आणि बुध-बृहस्पती यांचा समावेश असतो. श्रावण शुक्रवारी कुलदेवीची व लक्ष्मीमातेची तसेच जिवतीची पुजा करावी. फुले, आघाडा व दुर्वा ह्यांची एकत्र करून केलेली माळ, कुंकू लावलेला २१ मण्यांचा कापसाचा चौसर तिला घालावा. गंध, हळद-कुंकू, अक्षता लावाव्यात. जिवतीची आरती करावी. विड्यांच्या पानांबरोबर सुपारी व फळ ठेवून दुध्-साखरेचा व चणे-फुटाण्याचा नैवेद्य दाखवावा. 
 
स्वयंपाक वरण-भात-तूप, लिंबू, भाजी, पुरण, खीर, चटणी, कोशिंबीर, तळण, वाटली डाळ, आमटी असा करावा. ह्या दिवशी मुलांना वाण म्हणून "आरत्या" देतात त्या कराव्या. (आरत्या- कणकेत गुळ तुपाचे मोहन घालून छोट्या छोट्या कुरकेरीत तळलेया पुर्‍या.)
ALSO READ: Jivati Puja 2025 Wishes in Marathi श्रावण शुक्रवार विशेष जिवती पूजनाच्या हार्दिक शुभेच्छा
देवाला रांगोळी काढून नैवेद्य दाखवावा. सवाष्णीच्या ताटाभोवती रांगोळी काढावी. जेवावयास बसण्यापुर्वी पानापुढे विडा दक्षिणा ठेवून नमस्कार करावा. जेवण झाल्यावर सवाष्णीची खणा-नारळाने ओटी भरावी.
ALSO READ: Jivati Aarti जिवतीची आरती
मंत्र: "जरे जीवन्तिके देवी बालयुक्ते प्रमोदिनी | रक्षाव्रते महाशक्ती पूर्णकामे नमोस्तुते |" हा मंत्र 108 वेळा जपावा.

जिवतीची पुजा करून आरती झाल्यावर घरातील लहान मुलांना पाटावर बसवून त्यांचे औक्षण करावे. कुंकू अक्षता लावून चणे साखर फुटाण्याचे व आरत्याचे वाण द्यावे व आपल्या मुलांच्या कल्याणासाठी, व दिर्घायुश्यासाठी देवीकडे प्रार्थना करावी. जर मुलं परगावी असतील तर चारी दिशेला औक्षण करून अक्षता टाकाव्या म्हणजे परगावी असलेल्या मुलांचे औक्षण केल्या सारखे होईल.
 
या दिवशी शुक्रवारची कहाणी करावी. ALSO READ: कहाणी शुक्रवारची जिवतीची Khanai Shukravarchi Jivatichi

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती