चविष्ट साबुदाणा फ्रुट कस्टर्ड

मंगळवार, 15 जून 2021 (16:57 IST)
जर आपल्याला गोड खाणं आवडत तर या वेळी साबुदाण्याचे फ्रुट कस्टर्ड बनवा. हे खाण्यात चविष्ट आहे आणि बनवायला देखील सोपे आहे. चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य -
1 /2 कप साबुदाणा ,1 /2 कप नारळाचं दूध,3 मोठे चमचे कंडेस्ड मिल्क,सुके मेवे बारीक काप केलेले,चिरलेले फळ, डाळिंब, सफरचंद, संत्र, अननस किंवा इतर फळ देखील घेऊ शकता .
 
कृती- 
साबुदाणा पाण्यात भिजत ठेवा नंतर ह्याला उकळवून घ्या,उकळला की त्याला थंड पाण्याने धुवा.आता एका कढईत कंडेस्ड मिल्क आणि नारळाचं दूध घालून ते गरम करा.एक उकळी आल्यावर त्यात साबुदाणा मिसळा आणि 1 ते 2  मिनिटे ढवळा .हे मिश्रण थंड झाल्यावर त्यात कापलेले फळ आणि सुकेमेवे घालून द्या. काही वेळ थंड होण्यासाठी फ्रिजमध्ये ठेवा.थंडगार साबुदाणा फ्रुट कस्टर्ड खाण्यासाठी तयार आहे. हे कस्टर्ड बाउल मध्ये काढून सर्व्ह करा.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती