मुलांसाठी खास बनवा चीझ ऑमलेट

शनिवार, 12 जून 2021 (20:16 IST)
दररोज तीच न्याहारी खाऊन कंटाळा आला आहेत तर यंदा ऑमलेट बनवा पण या ऑमलेट ची चव वाढविण्यासाठी आपण त्यात चीझ घाला.चीझ हे मुलांना खूप आवडतो.ते हे ऑमलेट चवीने आणि आवडीने खातील.चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
 
साहित्य- 
2 अंडी,मीठ चवीप्रमाणे,काळीमिरपूड,1/4 कप किसलेले चीझ,1 कांदा बारीक चिरलेला,,1 टोमॅटो बारीक चिरलेला,कोथिंबीर,2 हिरव्या मिरच्या,3 चमचे लोणी किंवा तेल.
 
कृती- 
सर्वप्रथम अंडी फोडून त्यात मीठ,काळीमिरपूड,मीठ,कांदा,टोमॅटो घाला आणि चांगल्या प्रकारे फेणून घ्या.लोणी गरम करून वितळून घ्या.
  
एक पॅन गरम करण्यासाठी ठेवा त्यात वितळलेले लोणी घाला आणि फेणून ठेवलेल्या अंड्याचे मिश्रण घाला आणि पॅन वर पसरवून द्या.थोडं शिजू लागल्यावर त्यावर किसलेले चीझ घाला आणि त्याला पालटून द्या.दोन्ही कडून ऑमलेट भाजल्यावर प्लेट वर काढून गरम ऑमलेट सॉस सह सर्व्ह करा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती