घरात बसून देखील हाडे कमकुवत होऊ शकतात,या सवयी बदला

बुधवार, 9 जून 2021 (18:38 IST)
बऱ्याच वेळा वयाच्या पूर्वीच माणूस म्हातारा होतो,त्याचे कारण आहे त्याची खराब जीवन शैली.बरेच लोक असं म्हणतात की आम्हाला काहीच होणार नाहीं परंतु आयुष्यात शिस्त नसेल तर कधी काय घडेल हे सांगू शकत नाही.बऱ्याच वेळा आपण अनारोग्यादायी जीवनशैली अवलंबवून रोगांना आमंत्रित करतो.आपल्या काही अशाच वाईट सवयी वेळेच्या पूर्वीच आपल्या हाडांना कमकुवत करू शकतात.
घरात राहून देखील आपण आपले हाडे मजबूत करू शकतो.चला तर मग जाणून घेऊ या.
 
1 व्यायाम आणि योग-व्यायाम आणि योगाला आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनवा.या मुळे तनासह मनाची देखील मजबूती मिळेल.व्यायाम आणि योगा हे दोन्ही वेगळे आहे.व्यायाम केल्याने मेटॉबॉलिझ्म वाढतं,शारीरिक क्रिया होते.योगा केल्याने शरीरासह आपले मन आणि मेंदू देखील शांत होते.
 
2 मिठाला नको म्हणा- बहुतेक लोकांना वरून मीठ घेण्याची सवय असते.किंवा अन्नात मीठ कमी असल्यावर ते वरून मीठ घेतात.सॅलड मध्ये देखील मीठ जास्त प्रमाणात घेतात. जर आपली देखील सवय अशीच आहे तर आजच ही सवय बदलून घ्या.या मुळे आपली हाडे गळू शकतात. 
 
3 व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियम- शरीरात व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमच्या कमतरतेमुळे हाड कमकुवत होऊ लागतात. आणि वेळेपूर्वीच सांध्यात वेदना सुरु होते.म्हणून न्याहारीत,जेवणात कॅल्शियमयुक्त पदार्थ खावे.सकाळी 8-9 पर्यंत सूर्यप्रकाश घ्या.असं केल्याने शरीराला व्हिटॅमिन डी मिळेल.
 
4 धूम्रपान करू नका-जर आपल्याला धूम्रपान करण्याची सवय आहे तर ही सवय आजच सोडा. धूम्रपान केल्याने हाडांसाठी बनलेल्या पेशी नष्ट होतात. यामुळे  हाडे कमजोर होतात. यासह, हाडांशी संबंधित इतर समस्या देखील उद्भवू लागतात.
 
5 वजन कमी करणे - आज च्या काळात लोकांना न जास्त लठ्ठ न जास्त बारीक राहणे आवडते.जर आपले वजन सामान्यांपेक्षा जास्त आहे तर वजन कमी करा.कमी असल्यास अजून कमी करू नये. असं केल्याने ऑस्टियोपोरोसिस होण्याचा धोका वाढतो.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती