साबुदाणा जेवढे पोटासाठी फायदेशीर आहे तेवढेच सौंदर्याच्या दृष्टीने देखील फायदेशीर आहे. साबुदाण्याची पेस्ट बनवून आपण चेहऱ्यावर लावल्याने चेहऱ्यावर चकाकी येते.हे पॅक बनवायला देखील सोपे आहे.चला जाणून घेऊ या बनवायची कृती आणि फायदे.साबुदाण्यात व्हिटॅमिन बी 6 स्टार्च, आयरन, केल्शियम ,कॉपर,सेलेनियम,सोडियम तत्व आढळतात याची पेस्ट बनवून लावल्याने चेहऱ्यावरील डाग नाहीसे होतात.हे फेस पॅक चेहऱ्यावर लावून 15 मिनिट ठेवा नंतर पाण्याने धुवून घ्या.त्वचेची चमक पुन्हा मिळेल.
साबुदाण्याचे फेसपॅक बनविण्यासाठी एका भांड्यात साबुदाणा घ्या त्यात लिंबाचा रस मिसळा.गॅस वर गरम करण्यासाठी ठेवा. मिश्रण शिजल्यावर गॅस बंद करून द्या.थंड झाल्यावर मिक्सर मध्ये वाटून घ्या .त्यात ब्राऊन शुगर आणि लिंबू ,मुल्तानी माती मिसळा.फेसपॅक तयार आहे.