साहित्य -
250 ग्राम पनीर , 1/2 कप दही ,मीठ चवीनुसार,1/2 चमचा,काळी मिरपूड 2 चमचे तूप किंवा लोणी ,1/2 लहान चमचा जिरेपूड ,आलं पेस्ट,1 कांदा ,1 लाल,पिवळी आणि हिरवी ढोबळी किंवा शिमला मिरची ,3 टोमॅटो , 1 लहान चमचा चाट मसाला,2 चमचे कोथिंबीर,1 लिंबू कापलेले,
दह्याला फेणून घ्या.त्यात मीठ काळीमिरपूड,आलं पेस्ट मिसळा .या मध्ये पनीरचे तुकडे, शिमला मिरची ,टोमॅटोचे तुकडे,आणि कांदा मिसळून अर्ध्या तासासाठी ठेवून द्या.दह्यातून पनीरचे तुकडे काढून घ्या,ताटलीत ठेवून 1 -2 तास फ्रिजमध्ये ठेवा.
पनीर टिक्का असं बनवा-
एका नॉनस्टिक कढईत किंवा तव्यावर लोणी घालून गरम करा. एक स्टिक घ्या त्यात कांदा ,पनीर शिमलामिरची,टोमॅटो लावा आणि त्याला गरम तव्यावर किंवा कढईत मंद गॅसवर 12 मिनिटे शेकून घ्या .लिंबाचा रस आणि चाट मसाला घालून सर्व्ह करा.