सर्वप्रथम हरभराडाळीचे पीठ चाळून घ्या.एका भांड्यात हरभराडाळीचे पीठ घोळून घ्या.कढईत तेल घालून गरम झाल्यावर फोडणीसाठी त्यात जिरे-मोहरी घाला.नंतर लांब चिरलेले कांदे घालून तांबूस रंग येई पर्यंत भाजून घ्या.
नंतर त्यात लसूण,मिरचीची पेस्ट घालून परतून घ्या.त्यात हरभराडाळीचे घोळ घालून घट्ट होई पर्यंत ढवळत राहा.आपण आपल्या इच्छेनुसार घट्ट किंवा पातळ करू शकता.झुणका खाण्यासाठी तयार.
हा झुणका ज्वारीची भाकरी किंवा बाजरीच्या भाकरी सह सर्व्ह करा.