कैरीचा चविष्ट आंबट गोड छुंदा

रविवार, 30 मे 2021 (17:41 IST)
उन्हाळ्यात कैरीचा छुंदा बनवतात.हे खाण्यात आंबट-गोड असत.हा प्रकार गुजरात मध्ये जास्त करतात.चविष्ट असण्यासह हे पौष्टीक देखील आहे.जर हे व्यवस्थित साठवून ठेवले तर वर्षभर सहज ठेवता येत. चला साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य 
2 वाटी किंवा कप सोलून किसलेल्या कैऱ्या,1 वाटी साखर,1 चमचा मीठ,1 चमचा लाल तिखट,1/4 चमचा हळद,1/2 चमचा जिरेपूड.
 
कृती-
छुंदा बनवायला खूप सोपं आहे.हे बनविण्यासाठी सर्वप्रथम एक पॅन घ्या.त्यात किसलेली कैरी,मीठ,साखर आणि हळद घाला.साखर पूर्णपणे विरघळण्यासाठी सतत ढवळत राहा.या मिश्रणाची एक तारेची चाशनी बनवा.गॅस बंद करून थंड होण्यासाठी ठेवा.वरून लालतिखट आणि जिरेपूड घाला आणि मिसळा.छुंदा तयार.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती