बुंदीचे चविष्ट लाडू

मंगळवार, 1 जून 2021 (23:39 IST)
साहित्य -
3 वाट्या जाड दळलेले हरभराडाळीचे पीठ, 2 वाट्या साखर, 1 चमचा वेलची पूड,5 -6 केसरच्या कांड्या,चिमूटभर गोड खाण्याच्या पिवळा रंग,1 /4 कप दूध,तळण्यासाठी साजूक तूप.
 
कृती- 
बुंदीचे लाडू बनविण्यासाठी सर्वप्रथम हरभराडाळीचे पीठ चाळून घ्या.त्यात चिमूटभर पिवळा गोड रंग मिसळा.पाणी टाकून घोळ तयार करा.एका भांड्यात पाणी आणि साखर मिसळून एक तारी पाक तयार करा.पाकात थोडं केसर ,वेलची पूड आणि पिवळा रंग घाला. 
एका कढईत तूप घालून गरम करा त्यात चाळणी किंवा झाऱ्याच्या साहाय्याने डाळीच्या पिठाच्या घोळाला हळू-हळू करून घाला आणि बुंदी पाडा.बूंदी तळल्यावर पाकात घाला. बुंदीमध्ये पाक मुरल्यावर हातावर थोडंसं पाणी किंवा तूप लावून लहान लहान लाडू बांधा.अशा प्रकारे सर्व लाडू तयार करा.बुंदीचे लाडू खाण्यासाठी तयार.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती