स्वादिष्ट कुरकुरीत पोहे डोसा

मंगळवार, 8 जून 2021 (19:12 IST)
आपण डोसा रव्याच्या ,तान्दुळाचा खालला असणार आज पोहे डोसा करण्याची सोपी कृती सांगत आहो,चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घ्या.
 
साहित्य-
2 वाट्या तांदूळ,2 वाट्या पोहे,1 वाटी दही,चिमूटभरखायचा सोडा, मीठ, चवीप्रमाणे,तेल.
 
कृती-
तांदूळ आणि पोहे स्वत्रंत्रपणे धुवून त्यात पाणी ठेवून 6 -7 तास भिजत ठेवा.हे वाटून त्यात दही आणि मीठ घालून त्याचे घोळ बनवा.नंतर चिमूटभर सोडा घाला.
आता नॉनस्टिक तवा तापवायला ठेवा.नंतर एक चमचा तेल घालून हे तयार घोळ चमच्या ने पसरवून द्या आणि मध्यम आचेवर शेका.खालची बाजू तांबूस रंगाची होऊ द्या. कुरकुरीत डोसे चटणी सह सर्व्ह करा.  
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती