Christmas 2024: विशेष रेसिपी ट्री ब्राउनी

Webdunia
रविवार, 22 डिसेंबर 2024 (08:00 IST)
साहित्य-
डार्क चॉकलेट- 200 ग्रॅम वितळलेले  
मैदा- 100 ग्रॅम 
चिमूटभर मीठ 
बेकिंग पाउडर- 1/2 चमचा 
व्हॅनिला शुगर- 200 ग्रॅम 
अंडे- 2  
लोणी- 100 ग्रॅम 
हिरवा रंग- 2-3 थेंब 
आयसिंग शुगर- 250 ग्रॅम  
 
कृती-
सर्वात आधी ओव्हन 180 अंशांवर प्रीहीट करावे. आता बेकिंग डिशच्या काठावर किचन फॉइल लावावे. एका मोठ्या भांड्यात मैदा, बेकिंग पावडर आणि मीठ मिक्स करून घ्या. आता बटर आणि साखर घालून 5 मिनिटे मिक्स करा. नंतर एक एक करून अंडी, चॉकलेट आणि कॉफी घाला. आता बेकिंग डिशमध्ये मैदा घालावे आणि सुमारे 25 मिनिटे बेक करा.टूथपिकच्या मदतीने ब्राउनीज तपासून घ्या. आता टूथपिकवर मैदा बाहेर आल्यास आणखी काही मिनिटे बेक करा.तयार ब्राउनीज थंड करा आणि त्रिकोणाच्या आकारात कापून घ्या. एका वेगळ्या भांड्यात लोणी आणि आयसिंग शुगर हिरवा रंग मिसळा. ते पाइपिंग बॅगमध्ये ठेवा आणि ख्रिसमसच्या ट्री प्रमाणे ब्राउनी सजवा. तर चला तयार आहे आपली ख्रिसमस विशेष ट्री ब्राउनी. 
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
 
Edited By- Dhanashri Naik 

संबंधित माहिती

पुढील लेख