IndiaTourism : काही दिवसांत वर्ष संपणार आहे. तुम्हालाही या वर्षी भारतातील सुंदर आणि अप्रतिम ठिकाणांना भेट द्यायची असेल, ख्रिसमसच्या काळात सुट्ट्या असतात, त्यामुळे कुटुंब किंवा मित्रांसह या सर्वोत्तम ठिकाणांना नक्कीच भेट देऊ शकतात. आज आपण भारतातील अशाच काही ठिकाणांबद्दल पाहणार आहोत. जिथे तुम्ही ख्रिसमसमध्ये नक्कीच भेट देऊ शकतात.
शिलाँग-
तुम्ही ख्रिसमस साजरा करण्यासाठी शिलाँगला जाण्याचा विचार नक्कीच करू शकतात. हे सुंदर राज्य आहे. या ठिकाणी नवीन वर्षाचे सेलिब्रेशनही करता येईल. हे भारताचे सर्वोत्तम प्रवेशद्वार देखील मानले जाते. येथील वुडलँड हिल स्टे, सिल्व्हर ब्रूक होमस्टे सारखी ठिकाणे पर्यटकांसाठी आकर्षणाची केंद्रे आहे.