Khandoba Temple in Jejuri Maharashtra : महाराष्ट्रात पुणे जिल्ह्यात पुरंदर तालुक्यात असलेले जेजुरी हे तीर्थक्षेत्र असून हे मल्हारी मार्तंण्डला समर्पित आहे. अनेक भक्तांचे कुलदैवत असलेले मल्हारी मार्तंड हे साक्षात भगवान शंकरांचे अवतार मानले जातात. मल्हारी मार्तंडला भक्त प्रेमाने, श्रद्धेने खंडोबा असे देखील म्हणातात. खंडोबा हे महाराष्ट्राचे कुलदैवत असून खंडोबाची नगरी जेजुरीला सोन्याची जेजुरी देखील संबोधले जाते. पिवळ्या धमक रंगाने न्हालेली मार्तंडाची जेजुरी सोन्याची भासते. येथे भाविक लोक हळद-बुक्का उधळतात. यळकोट यळकोट जय मल्हार असा गजर करतात. खंडोबा हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत आहे. लाखो भक्तीचे श्रद्धास्थान असलेली हे स्थळ पुरंदर तालुक्यात आहे.
तसेच जेजुरी गावात असलेल्या जेजुरी गडावर खंडोबाचे मंदिर पाहण्यासाठी, खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी मंदिराला 385 पायऱ्या असून या पायऱ्या चढून जावे लागते. मंदिरात असलेले अश्वारूढ उभी खंडोबाची प्रतिमा भक्तांना भरभरून आशीर्वाद देते. तसेच सोबत खंडोबाची पत्नी म्हाळसा देवी यांची देखील प्रतिमा आहे. तसेच येथील अशी मान्यता आहे की, नववधूला नवरदेव कडेवर उचलून घेऊन पायऱ्या चढत खंडोबाचे दर्शन घडवतो असे केल्याने खंडोबाचा आशीर्वाद मिळतो. तसेच या मंदिरच्या पायऱ्या चढतांना वाटेत बाणाई मंदिर लागते. बाणाई म्हणजे बानुबाई या खंडोबाच्या दुसऱ्या पत्नी होय.
जेजुरीचा खंडोबा नवसाला पावतो म्ह्णून अनेक भक्त नवस करतात आणि इच्छा पूर्ण झाल्यावर मनोभावे नवस फेडण्यासाठी जेजुरीत येतात. व भक्त मोठ्या श्रद्धेने भंडारा उधळत असतात तसेच जेजुरी मध्ये डोंगरावर असलेले खंडोबाचे हे मंदिर अतिशय सुंदर आणि अद्भुत असून काळ्या दगडांमध्ये बांधलेले आहे. तसेच या मंदिराची वास्तुकला हेमाडपंथी असून हे मंदिर 1608 मध्ये बांधण्यात आले आहे. तसेच मंदिरच्या सुरवातीला दगडांची अशी भव्य कामं देखील पाहावयास मिळते. तसेच काही वर्षांपूर्वी धनगर समाजाच्या येथे दीपमाळ आणि पायऱ्या उभारल्या. ज्यामुळे हे मंदिर अतिशय विलक्षण आणि तेजस्वी भासते.
खंडोबाचा उत्सव चंपा षष्ठी-
मल्हारी मार्तंडचा उत्सव म्हणजे चंपा षष्ठी ही मराठी महिना मार्गशीर्ष या महिन्यामध्ये येते. मार्गशीर्ष महिना लागताच पहिल्या दिवशी खंडोबाचे नवरात्र बसते. अनके जणांचे कुलदैवत असल्याने अनेकांच्या घरी खंडोबाचे नवरात्र स्थापित केले जाते. हे नवरात्र स्थापित करण्याचा उद्देश असा आहे की, खंडोबाने मणी आणि मल्ल या दोन राक्षसांशी युद्ध करून त्यांना पराजित केले होते व भक्तांचे रक्षण केले होते. खंडोबाचे आभार मानण्यासाठी म्ह्णून भक्त चंपा षष्ठी साजरी करतात. चंपा षष्ठीचे नवरात्र हे सहा दिवसांचे असून मार्गशीर्ष शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध षष्ठी असे आहे. या दिवशी गावोवागी जागरण केले जाते खंडोबाच्या नावाने गोंधळ घातला जातो. भंडारा उधळला जातो. तसेच या दॆवशी खंडोबाला वांग्याचे भरीत आणि भाकरीचा नैवेद्य अर्पण केला जातो. खंडोबा नेहमी आपल्या भक्ताच्या हाकेला धावून येतात. म्हणून महाराष्ट्रात खंडोबाच्या सोन्याच्या जेजुरीचे नक्कीच दर्शन घ्यावे.