खंडोबा मंदिर पाली सातारा

गुरूवार, 5 डिसेंबर 2024 (07:30 IST)
Khandoba Temple Pali Satara Maharashtra : मार्गशीर्ष महिना सुरु झाला असून हा मराठी पवित्र महिना लागताच मल्हारी मार्तंडाचे नवरात्री सुरु होते मल्हारी मार्तंड म्हणजे जेजुरीचे खंडोबा होय सहा दिवसांचे नवरात्र हे अनेक जण आपल्या घरी बसवतात.  
 
महाराष्ट्राचे कुलदैवत असलेले खंडोबा हे भक्ताच्या हाकेला धावणारे आहे. तसेच खंडोबाला नवस बोलल्यास नवस पूर्ण होतो अशी अनेक भक्तांची श्रद्धा आहे तसेच नवस पूर्ण झाल्यानंतर अनेक भक्त नवस फेडण्यासाठी जेजुरी मध्ये दाखल होतात. तसेच खंडोबाचे मुख्य मंदिर हे पुण्याजवळी जेजुरी येथे आहे तसेच महाराष्ट्रात आणि देशातील काही राज्यांमध्ये देखील खंडोबाचे मंदिरे आहे तसेच आपण खंडोबाच्या एका मंदिराबद्दल जाणून घेऊ या.  
 
महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यामध्ये पाली एक गाव असून येथे खंडोबाचे प्राचीन मंदिर आहे तसेच हे तीर्थक्षेत्र पालीचा खंडोबा म्हणून देखील प्रसिद्ध आहे भगवान शंकराचे अवतार असलेले खंडोबांना समर्पित हे मंदिर आहे. तसेच अनेक भक्त खंडोबाचे दर्शन घेण्यासाठी पाली येथे दाखल होत असतात तसेच चंपा षष्ठीला विशेष गर्दी येथे पाहावयास मिळते पाली येथे असलेले खंडोबाचे मंदिर हे तारळी नदीच्या किनाऱ्यावर स्थापित आहे. 
 
तसेच पालीच्या खंडोबाची दिवसातून चार वेळेस पूजा केली जाते. या मंदिराचा इतिहास जुना असून येथील स्थानिक नागरिकांच्या मते हे मंदिर अति प्राचीन असून साधारण एक हजार वर्षापूर्वीचे हेमाडपंथी बांधकामात बांधलेले आहे. या मंदिराची विशेषतः म्हणजे येथे नारळ वाढवला जात नाही तसेच पालीचा खंडोबा नवसाला पावतो म्हणून येथे अनेक भक्तगण दर्शनासाठी येतअसतात. जानेवारी महिन्यात पालीचा खंडोबा येथे मोठी जत्रा भरते हजारोंच्या संख्यने भक्त या जत्रेमध्ये सहभागी होतात.  
 
तसेच या मंदिरात खंडोबाचा आणि पत्नी म्हाळसा देवीचा पितळी मुखवटा आहे.  शेजारी खंडोबाची दुसरी पत्नी बानुबाई यांची देखील मूर्ती आहे. मंदिराला तीन प्रवेश द्वार असून मंदिराच्या परिसरात दीपमाळ देखील आहे. तसेच या मंदिरात मारुती, म्हसोबा, विठ्ठल, ज्योतिबा या देवांचे देखील मंदिरे आहे. दरवर्षी मृग नक्षत्रावर खंडोबा आणि देवी म्हाळसाचा विवाह लावण्यात येतो तेव्हा येथील वातावरण प्रसन्न असते.  भक्त भंडारा उधळवून  खंडोबाचा विवाह साजरा करतात खंडोबाच्या जयघोषाने येथील वातावरण दुमदुमून जाते प्रत्येक भक्त यळकोट,यळकोट जय मल्हार! सदानंदाचा यळकोट असा जयघोष करतात नवसाला पावणारा खंडोबा आपल्या भक्ताच्या हाकेला सदैव धावून येतो तुम्ही देखील चंपा षष्ठीला पालीच्या खंडोबाचे नक्कीच दर्शन घेऊ शकतात. 
 
खंडोबा मंदिर पाली सातारा जावे कसे? 
महाराष्ट्रातील सातारा हे एक प्रमुख शहर असून सातारा शहरात पोहचण्यास अनेक वाहन उपलब्ध आहे. परिवहन मंडळाच्या बसने देखील सातारा मध्ये गेल्यावर पालीच्या खंडोबाला जात येते तसेच पुण्यापासून पाली हे गाव साधारण 135 किमी अंतरावर आहे त्यामुळे विमानमार्गेने जायचे असल्यास पुणे अंतर्राष्ट्रीय विमानतळावरून कॅप किंवा टॅक्सीच्या मदतीने मंदिरापर्यंत पोहचता येते तसेच सातारा रेल्वे स्टेशन मार्ग अनेक रेल्वे मार्गांना जोडलेला असल्याने रेल्वे मार्गाने देखील जात येते.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती