Christmas Tour Package 2024 ख्रिसमस आणि नवीन वर्ष अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. देशभरातील लोक तो साजरा करण्याच्या तयारीत व्यस्त आहेत. अनेकजण ख्रिसमससाठी परदेशात जाण्याचा बेत आखत आहेत, तर अनेकजण देशातील चांगल्या ठिकाणी जात आहेत. पण कमी बजेट असलेल्यांसाठी सहलीचे नियोजन करणे थोडे अवघड जाते. म्हणून ते काही स्वस्त ठिकाणी सहलीची योजना आखतात. तुम्हालाही कुठेतरी जायचे असेल तर तुम्ही टूर पॅकेज घेऊन तुमच्या सहलीचे नियोजन करू शकता. IRCTC (इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन) ने आकर्षक टूर पॅकेज आणले आहे. यामध्ये तुम्हाला बजेट अगोदरच सांगितले जाते, त्यामुळे तुम्हाला जास्त खर्च करावा लागणार नाही.
अमृतसर टूर पॅकेज- हे पॅकेज दिल्लीपासून सुरू होत असून तुम्ही 24 डिसेंबर रोजी पॅकेजसाठी तिकीट बुक करू शकाल. यानंतर तुम्ही दर शुक्रवार आणि शनिवारी तिकीट बुक करू शकता. पॅकेज 1 रात्र आणि 2 दिवसांसाठी आहे. पॅकेज कॅबची सुविधा उपलब्ध असेल. एकट्याने प्रवास करत असल्यास, पॅकेज फी 13980 रुपये आहे तर दोन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 8810 रुपये आहे. तीन लोकांसह प्रवास करण्यासाठी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 7425 रुपये आहे. मुलांसोबत प्रवास करण्यासाठी पॅकेज फी 6225 रुपये आहे. भारतीय रेल्वेच्या अधिकृत वेबसाइटवरून तिकीट बुक करण्याची प्रक्रिया सोपी आहे.
रवंगला टूर पॅकेज- हे पॅकेज बागडोगरा आणि कोलकाता येथून सुरु होत असून यासाठी तुम्ही 21 डिसेंबरसाठी तिकिट बुक करु शकाल. पॅकेज 3 रात्र आणि 5 दिवसांसाठीचा आहे. दोन लोकांसाठी फी प्रति व्यक्ती पॅकेज शुल्क 14,123 रुपये आहे. तीनसाठी प्रति व्यक्ती पॅकेज फी 13,304 रुपये आणि मुलांसह प्रवास करत असाल तर पॅकेज फी 11,665 रुपये आहे.
कुन्नूर - ऊटी टूर पॅकेज- या पॅकेजची सुरुवात गुंटूर जंक्शन, हैदराबाद, नल गोंडा, सिकंदराबाद आणि तेनाली जंक्शन येथून होत असून आपण 24 डिसेंबरसाठी तिकिट बुक करु शकाल. यानंतर आपण दर मंगळवारी तिकिट बुक करु शकता. पॅकेज 5 रात्र आणि 6 दिवसांचे आहे. पॅकेजची सुरुवात कॅबने होईल. पॅकेज फी- दो लोकांसाठी प्रवास करण्यासाठी प्रती व्यक्ती पॅकेज फी 14240 रुपये आहे. तीन लोकांसाठी प्रवास करत असाल तर प्रती व्यक्ती पॅकेज फी 12600 रुपये आहे. मुलांसाठी प्रवास करत असाल पॅकेज फी 9100 रुपये आहे.