Netherlands Tourism : नेदरलँड्स हा युरोप खंडातील एक अतिशय आकर्षक देश असून जो युरोपच्या उत्तर-पूर्वेस स्थित आहे. नेदरलँडचे दुसरे नाव हॉलंड देखील आहे. नेदरलँडचे दृश्य खूप सुंदर आहे, त्याच्या सौंदर्याचे मुख्य कारण म्हणजे येथे बहरलेली सुंदर फुले. तसेच येथे अनेक सुंदर बागा पहायला मिळतात. ज्यात फुललेली फुले अनेक पर्यटकांना आकर्षित करतात.
तसेच येथील विशेष म्हणजे नेदरलँडच्या लोकांची उंची जगातील इतर लोकांपेक्षा जास्त आहे. तसेच ऑडिओ, व्हिडिओ आणि सीडी टेप्स बनवणारी जगातील पहिली कंपनी फिलिप्स आहे, जी नेदरलँडची आहे.
नेदरलँड हा युरोप खंडातील एक अतिशय सुंदर देश असून जिथे जगभरातून पर्यटक येतात. नेदरलँडमधील प्रत्येक शहर पर्यटनाच्या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. नेदरलँड्सची प्रसिद्ध पर्यटन स्थळे ॲमस्टरडॅम, रॉटरडॅम, द हेग, आइंडहोवन, नेदरलँड्स डेल्फ्ट, एडम, मास्ट्रिच, थॉर्न, ब्रेडा हे नेदरलँड प्रमुख पर्यटन स्थळे असून प्रत्येक पर्यटन स्थळ हे खूप अद्भुत आणि खास आहे.
नेदरलँड जावे कसे?
भारतातून नेदरलँड्सला जाण्यासाठी दिल्ली, मुंबई, हैदराबाद, चेन्नई इत्यादी भारतातील प्रमुख शहरांमधून नेदरलँड्ससाठी फ्लाइट उपलब्ध आहे. तसेच अनेक नॉन-स्टॉप उड्डाणे आहे जी तुम्हाला थेट नवी दिल्ली ते नेदरलँड्सची राजधानी ॲमस्टरडॅमपर्यंत घेऊन जातील. तुम्ही जगातील कोणत्याही प्रदेशातून फ्लाइटने नेदरलँडला पोहोचू शकता. तसेच KLM हे नेदरलँडचे एक अतिशय प्रसिद्ध विमानतळ आहे जे आंतरराष्ट्रीय स्तरावर जगातील प्रत्येक विमानमार्गाशी जोडलेले आहे.