Maharashtra Tourism : आज छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मदिवस आहे. महाराष्ट्राचे दैवत असलेले छत्रपती यांनी स्वराज्याची स्थापना केली. संपूर्ण महाराष्ट्रात छत्रपतींची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त तुम्हाला देखील त्यांच्याशी जोडल्या गेलेल्या पवित्र वास्तूला भेट द्यायची असेल तर आज आपण या लेखात छत्रपतींशी जोडल्या गेलेल्या अश्याच एका पवित्र किल्ल्याबद्दल जाणून घेणार आहोत. बलाढ्य व्यक्तिमत्व असलेले कुशाग्र बुद्धिमत्ता, मायाळू असे छत्रपती यांचा जन्म महाराष्ट्रातील जुन्नर मध्ये शिवनेरी किल्ल्यावर आई जिजामाता यांच्या पोटी झाला.
शिवनेरी किल्ला हे एक उत्तम ठिकाण आहे जी छत्रपतींची जन्मभूमी आहे. तसेच हा किल्ला महत्वाच्या ऐतिहासिक किल्ल्यांपैकी एक आहे. शिवनेरी किल्ला हा १७ व्या शतकातील एक लष्करी किल्ला आहे जो भारतातील पुणे जिल्ह्यातील जुन्नरजवळ आहे. याच किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज हे महान योद्धे जन्माला आले होते. शिवनेरी किल्ल्यावर महाराजांचा जन्म 19 फेब्रुवारी 1630 रोजी झाला. महाराजांचे वडील शहाजी भोसले हे विजापूर येथील सुलतानाच्या सैन्यात सेनापती होते आणि महाराजांच्या आई जिजाबाई या जाधव कुळात जन्मलेल्या प्रतिभावान स्त्री होत्या.
शिवनेरी छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्म स्थळ आहे. शिवनेरीचा हा प्राचीन किल्ला महाराष्ट्र राज्यात जुन्नर शहराजवळ पुण्यापासून अंदाजे १०५ किलोमीटरवर आहे. या किल्ल्याला चारही बाजूंनी कठीण चढाव असून त्याला जिंकावयास कठीण असा बालेकिल्ला आहे. तसेच या गडावर मुख्य दारा शिवाय एक साखळी दार देखील आहे. या साखळीला धरून पर्यटक डोंगर चढून किल्यावर पोहोचतात. किल्ल्यावर शिवाई देवीचे छोटे मंदिर व जिजाबाई व बाल-शिवाजी यांच्या प्रतिमा आहे. या किल्ल्याचा आकार शंकराच्या पिंडीसारखा आहे. येथे बदामी तलाव नावाचे पाण्याचे तलाव आणि गंगा, यमुना नावाचे पाण्याचे झरे आहे, इथे वर्षभर पाणी भरलेले असते. तसेच छत्रपति शिवाजी महाराजांच्या प्रतिमेपासून डाव्या बाजूचा डांबरी रस्ता आपणास गडाच्या पायर्यार्यांपाशी घेऊन जातो. या वाटेने गडावर येताना सात दरवाजे लागतात. पहिला महादरवाजा, दुसरा पीर दरवाजा, तिसरा परवानगीचा दरवाजा, चौथा हत्ती दरवाजा, पाचवा शिपाई दरवाजा, सहावा फाटक दरवाजा आणि सातवा कुलाबकर दरवाजा.
शिवनेरी किल्ल्याचा इतिहास
जुन्नर हे शहर प्राचीन भारतातील सर्वात जुन्या शहरांपैकी एक आहे जिथे शक राजवंशाचे राज्य होते. जुन्नरच्या सभोवतालच्या टेकड्यांमध्ये १०० हून अधिक गुहा आहे, शिवनेरी किल्ला त्यापैकी एक आहे. तसेच ज्या टेकडीवर हा किल्ला बांधला आहे तो एका मोठ्या खाडीने संरक्षित आहे आणि म्हणूनच किल्ला बांधण्यासाठी ते सर्वात योग्य ठिकाण होते. येथे ६४ गुहा आणि आठ शिलालेख आढळतात. तसेच १५९९ मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजी भोसले आणि नंतर छत्रपती शिवाजी महाराजांचे वडील शहाजी राजा यांना हा किल्ला देण्यात आला होता.
शिवनेरी मध्ये बरीच मौल्यवान ठिकाण बघायला मिळतात. या मध्ये एकूण 7 दार आहे, महादरवाजा, पीर दरवाजा, फाटक दरवाजा, हट्टी दरवाजा, परगंचना दरवाजा, कुल्बखत दरवाजा आणि शिपाई दरवाजा.
जन्म घर
छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इथेच झाला होता अलीकडेच ह्या घराचे नूतनीकरण केले आहे.
प्रतिमा
गडाच्या दक्षिणेला जिजाबाई आणि बाळ शिवाजींची प्रतिमा आहे.
शिवाई मंदिर
गडामध्ये श्री शिवाई देवींचे देऊळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव शिवाई देवींच्या नावावर ठेवले होते.
गडाच्या उत्तरेकडे बदामी नावाचे तळ आहे. वैशिष्ट्य असे की जे कधीही कोरडे पडत नाही जे नेहमी पाण्याने भरलेले असते.
प्राचीन लेण्या
गडाजवळ काही भूमिगत बौद्ध प्राचीन लेण्या आहे.
पाण्याचे साठे
गडात काही खडकाचे धरण देखील आहे. गंगा आणि यमुना त्यांच्या मध्ये मोठ्या पाण्याच्या टाक्या आहे.
मुघल मशीद
मुघल काळातील एक मशीद देखील गडावर आहे.
शिवनेरी किल्ला जुन्नर जावे कसे?
रस्ता मार्ग- पुणे हे एकमेव स्थळ आहे जिथून आपण शिवनेरी गडावर पोहोचू शकता. पुणे शहरापासून शिवनेरी चे अंतर सुमारे 95 किमी आहे. एसटी आणि खाजगी सेवा नियमितपणे पुणे आणि मुंबई, हैद्राबाद, कोल्हापूर आणि गोवा सारख्या भारतातील विविध शहरामध्ये चालतात. जुन्नर मार्गे देखील बस ने जात येते. पुण्यातून टेक्सी किंवा खासगी वाहन मदतीने किल्ल्यापर्यंत सहज पोहचता येते.
रेल्वे मार्ग- पुणे रेल्वे स्टेशन शिवनेरीजवळचे सर्वात नजीकचे स्टेशन आहे. पुणे शहर हे मुबई, हैदराबाद, बंगलोर, चेन्नई, दिल्ली आणि अनेक शहरांशी रेल्वे मार्गाने जोडलेले आहे. किल्ल्यावर जाण्यासाठी स्टेशन वरून बस किंवा टॅक्सीच्या मदतीने जात येते.
विमान मार्ग- पुणे -लोहगाव विमानतळ शिवनेरी किल्ल्यावर जाण्यासाठी सर्वात जवळचे विमानतळ आहे. विमानतळावरून टॅक्सी किंवा खासगी वाहनाच्या मदतीने किल्ल्यापर्यंत नक्कीच पोहचता येते.