Valentine's Day Special देशातील या रोमँटिक ठिकाणी व्हॅलेंटाईन डे करा साजरा
शुक्रवार, 14 फेब्रुवारी 2025 (07:30 IST)
India Tourism : आज व्हॅलेंटाईन डे आहे तसेच व्यस्त जीवनशैलीमुळे जोडप्यांना एकमेकांसोबत घालवण्यासाठी कमी वेळ मिळतो. अशा परिस्थितीत व्हॅलेंटाईन डे हा एकमेव दिवस आहे ज्यामध्ये ते त्यांचे प्रेम व्यक्त करतात आणि त्यांच्या जोडीदाराला खास अनुभव देतात. व्हॅलेंटाईन डे हा प्रेम आणि रोमँटिक असा एक खास दिवस आहे, या दिवशी जोडप्यांना त्यांचे नाते साजरे करण्यासाठी बाहेर जायला आवडते. तसेच या रोमँटिक दिवशी देशातील अनेक प्रेक्षणीय ठिकाणी तुम्ही तुमच्या जोदीरासोबत नक्कीच वेळ घालवू शकतात तर चला जाणून घ्या देशातील काही रोमँटिक पर्यटन स्थळे जिथे तुम्ही न्नकीच व्हॅलेंटाईन डे साजरा करू शकतात.
व्हॅलेंटाईन डे ला तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवण्यासाठी तुम्ही मुंबईतील अशा संग्रहालयात नक्कीच जाऊ शकता हे ठिकाण अशा जोडप्यांना आकर्षित करेल ज्यांना फोटो, ऑप्टिकल भ्रम आणि रोमांचक अनुभव आवडतात. मुंबईत अशी अनेक संग्रहालये आहे, जी तुम्हाला एक रोमांचक अनुभव देतील. यासाठी तुम्ही पॅराडॉक्स संग्रहालयात देखील जाऊ शकता. येथे तुम्ही अशा क्रियाकलाप करू शकाल जे तुमचे डोळे आणि मन चकित करतील. तुम्हाला 3D इल्युजन आणि इन्फिनिटी रूम देखील पाहता येईल.
वांद्रे किल्ला मुंबई
व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी तुम्ही वांद्रे किल्ल्यावर जाऊ शकता. हे मुंबईतील वांद्रे परिसरात आहे. या ठिकाणी प्रवेश मोफत आहे. अरबी समुद्राचे सुंदर दृश्य पाहत तुमच्या जोडीदारासोबत आरामदायी क्षण घालवल्याने तुमचा व्हॅलेंटाईन डे खरोखरच संस्मरणीय होईल.
तुमच्या जोडीदारासोबत व्हॅलेंटाईन डे साजरा करण्यासाठी हँगिंग गार्डन हे सर्वोत्तम ठिकाण आहे. हँगिंग गार्डन शहराच्या गजबजाटात हे एक शांत ठिकाण आहे. उद्यानातील हिरवळ, छाटलेले कुंपण आणि शांत वातावरण यामुळे हे ठिकाण भेट देण्यासाठी सर्वोत्तम आहे. हे मुंबईतील भेट देण्यासाठी सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक आहे.
दिघा बीच पश्चिम बंगाल
पश्चिम बंगालमधील सर्वात सुंदर आणि रोमँटिक समुद्रकिनाऱ्याला भेट देण्याचा विचार येतो तेव्हा अनेक जोडपी प्रथम दिघा बीचचे नाव घेतात. दिघा बीच हा संपूर्ण पश्चिम बंगालचा मुख्य आकर्षण मानला जातो.
पश्चिम बंगालमधील मेदिनीपूर येथे असलेला दिघा बीच त्याच्या अनेक गोष्टींमुळे रोमँटिक बनतो. येथील समुद्रकिनारा सूर्योदय आणि सूर्यास्ताच्या मनमोहक दृश्यांव्यतिरिक्त, त्याच्या सोनेरी वाळूसाठी प्रसिद्ध आहे.म्हणूनच हा समुद्रकिनारा एक परिपूर्ण रोमँटिक ठिकाण मानला जातो. व्हॅलेंटाईन डे निमित्त तुम्ही नक्कीच इथे भेट देऊ शकतात.
मसुरी हिल स्टेशन उत्तराखंड
व्हॅलेंटाईन डे निमित्त भेट देण्यासाठी मसुरी हे उत्तराखंडच्या सुंदर दऱ्याखोऱ्यांमध्ये वसलेले एक सुंदर आणि रोमँटिक हिल स्टेशन आहे मसुरीला 'टेकड्यांची राणी' असेही म्हणतात. त्याच्या सौंदर्यासोबतच, मसुरी हे एक सुरक्षित हिल स्टेशन देखील मानले जाते. मसुरीमध्ये तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत मॉल रोड, कंपनी गार्डन, केम्प्टी फॉल्स आणि नो व्ह्यू पॉइंट सारखी सुंदर ठिकाणे एक्सप्लोर करू शकता.
संख्या सागर शिवपुरी मध्य्प्रदेश
व्हॅलेंटाईन डे दिवशी शिवपुरीच्या आसपास असलेल्या एखाद्या अद्भुत आणि सुंदर ठिकाणी भेट देण्याची वेळ येते तेव्हा अनेक जोडपी प्रथम सांख्य सागराच्या काठावर पोहोचतात. हे तलाव त्याच्या सौंदर्य आणि शांत वातावरणामुळे दररोज एक डझनहून अधिक जोडप्यांना आकर्षित करते. हे एक कृत्रिम तलाव आहे.
सांख्य सागरभोवतीची हिरवळ आणि मनमोहक दृश्ये पर्यटकांना आकर्षित करतात. व्हॅलेंटाईन डे निमित्त अनेक जोडपी एक सुंदर संध्याकाळ घालवण्यासाठी सांख्य सागरच्या काठावर पोहोचतात.
कैकोंड्राहल्ली तलाव बंगळुरू
बेंगळुरूमधील कैकोंड्राहल्ली तलाव हा खूप रमणीय आहे व्हॅलेंटाईन डे निमित्त जोडीरसोबाबत नक्कीच इथे भेट देऊ शकतात हे तलाव 48 एकर क्षेत्रात पसरलेले आहे. इथे तुम्हाला आराम आणि शांती मिळेल, तर तुम्ही या तलावाच्या काठावर बसू शकता. येथे तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत तासनतास घालवू शकता.