India Tourism : भारतातील ओडिशातील भुवनेश्वर शहरापासून अवघ्या सात किलोमीटर अंतरावर टेकड्यांवर उदयगिरी आणि खंडगिरीच्या लेण्या आहे. तसेच या लेण्या भारतातील प्राचीन आणि ऐतिहासिक लेण्यांपैकी एक असून ज्यांचा उल्लेख हाथीगुम्फा शिलालेखात कुमारी पर्वत म्हणून केला आहे. तसेच या लेण्या जैन समुदायाने बांधलेल्या सर्वात जुन्या लेण्यांपैकी एक असल्याचे म्हटले जाते. तसेच उदयगिरी आणि खंडगिरी या दोन्ही वेगवेगळ्या गुहा आहे. उदयगिरीमध्ये एकूण 18 गुहा आहे तर खंडगिरीमध्ये एकूण 15 गुहा आहे. तसेच येथील गुहा म्हणजे उदयगिरीच्या आत असलेली राणीगुंफा, जी एक दुमजली मठ आहे. तसेच या ठिकाणाचे ऐतिहासिक महत्त्व खूप आहे जे पर्यटक आणि इतिहास प्रेमी दोघांनाही आकर्षित करते.
उदयगिरी आणि खंडगिरी लेण्यांचा इतिहास-
या लेण्यांचा इतिहास अति प्राचीन असून जो हिंदू धार्मिक कल्पनांच्या पायाचा काळ होता. संशोधकांच्या मते, उदयगिरी आणि खंडगिरी येथील लेणी ईसापूर्व दुसऱ्या शतकात राजा खारावेलाच्या कारकिर्दीत जैन भिक्षूंसाठी निवासस्थान म्हणून कोरल्या गेल्या होत्या. काही बारीक आणि सुशोभित कोरीव काम केलेल्या लेण्या ईसापूर्व पहिल्या शतकातील आहे. या प्राचीन दगडी कोरीव लेण्यांचा शोध पहिल्यांदा 19 व्या शतकात लागला होता.
उदयगिरीच्या मुख्य लेण्या-
उदयगिरी लेणी मध्ये एकूण 18 प्रमुख लेण्यांचा समावेश आहे. उदयगिरी लेणी मधील प्रमुख गुफा राणी गुंफा असून ही गुहा सर्वात मोठी आणि प्रसिद्ध गुहा आहे. ज्याच्या आत अनेक प्राचीन आणि सुंदर शिल्पे आहे. तसेच बाजघर गुंफा, लहान हत्तीची गुहा, अलकापुरी गुंफा, जया विजया गुंफा, पनासा गुम्फा, ठाकुरानी गुंफा, पाताळपुरी गुंफा, मानकापुरी आणि स्वर्गपुरी गुंफा, गणेश गुंफा, जांबेश्वरा गुंफा, व्याघर गुंफा, सर्पा गुंफा, हाथी गुंफा, धनाघर गुंफा, हरिदास गुंफा, जगन्नाथ गुंफा, रसुई गुंफा या लेण्यांचा समावेश उदयगिरीच्या लेण्यांमध्ये होतो.
खंडगिरीच्या प्रसिद्ध लेण्या-
खंडगिरी टेकड्या मध्ये एकूण 15 लेण्यांचा समूह आहे. त्यामध्ये तातोवा गुहा ही गुहा खंडगिरी लेण्यांपैकी पहिली गुहा आहे. त्याच्या प्रवेशद्वारावर पोपटांचे कोरीवकाम आहे, त्यामुळे त्याला तातोवा गुम्फा असे म्हणतात. तसेच अनंता गुंफा, तेंटुली गुंफा, खंडगिरी गुंफा, ध्यान गुंफा, नवमुनी गुंफा, बारभुजी गुंफा, ट्रुसुला गुम्फा, अंबिका गुंफा, ललाटेंडू केशरी गुम्फा या लेण्यांचा समावेश खंडगिरीच्या लेण्यांमध्ये होतो.
उदयगिरी आणि खंडगिरी लेण्या भुवनेश्वर कसे जावे?
विमानमार्ग-लेण्यांपासून जवळचे विमानतळ भुवनेश्वर विमानतळ किंवा बिजू पटनायक आंतरराष्ट्रीय विमानतळ आहे जे 8 किमी अंतरावर आहे. विमानतळावरून कॅब, टॅक्सी किंवा इतर स्थानिक वाहनांच्या मदतीने उदयगिरी आणि खंडगिरी लेण्यांपर्यंत सहज पोहचता येते.
रेल्वे मार्ग- भुवनेश्वर रेल्वे स्टेशन देशाच्या पूर्वेकडील भागातील एक महत्त्वाचे रेल्वे स्टेशन असून प्रमुख शहरांशी जोडलेले आहे. भुवनेश्वर रेल्वे मार्ग कोलकाता, मुंबई, दिल्ली, चेन्नई, हैदराबाद, बंगळुरू इत्यादी रेल्वे मार्गांशी जोडलेला आहे.
रस्ता मार्ग-भुवनेश्वरला जाणारा हायवे अनेक मार्गांना जोडलेला आहे. तसेच प्रमुख शहरांमधून बसेस उपलब्ध आहे. शहरातील बारामुंडा बस स्टँड भुवनेश्वरला भारतातील इतर सर्व प्रमुख शहरांशी रस्त्याने जोडते. तसेच तुम्ही खासगी वाहन किंवा बसच्या लेण्यांपर्यंत लेण्यांपर्यंत नक्कीच पोहचू शकतात.