India Tourism : नरक चतुर्दशीचा सण, ज्याला छोटी दिवाळी असेही म्हणतात, दिवाळीच्या एक दिवस आधी साजरा केला जातो. धार्मिक आणि पौराणिक दृष्टिकोनातून हा सण अत्यंत महत्त्वाचा आहे. या दिवशी भगवान श्रीकृष्णाने नरकासुराचा वध केला आणि धर्माची पुनर्स्थापना केली. असे म्हटले जाते की या दिवशी स्नान, दान आणि पूजा केल्याने व्यक्तीचे पाप नष्ट होतात आणि घरात समृद्धी येते. जर तुम्ही नरक चतुर्दशी रोजी तुमच्या कुटुंबासह धार्मिक तीर्थयात्रेची योजना आखत असाल, तर भारतातील ही पवित्र स्थळे विशेष विधी आणि उपासनेसाठी प्रसिद्ध आहे.