Dubai Tourism : जगातील सर्वात उंच इमारत म्हणजे दुबई शहरात असलेली बुर्ज खलिफा होय. तसेच बुर्ज खलिफा ही इमारत 163 मजली असून आकाशाला भिडतांना दिसते. तसेच या इमारतीची विशेषतः म्हणजे बुर्ज खलिफाची उंची एवढी आहे की तुम्ही ती नव्वद किलोमीटर अंतरावरूनही पाहू शकता. तसेच बुर्ज खलिफा पर्यटकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहे. आणि बुर्ज खलिफाच्या आतील भागात 24 कॅरेट सोन्याचा वापर करण्यात आला आहे. दुबईच्या सर्वात प्रसिद्ध आकर्षणांमध्ये बुर्ज खलिफाचे नाव प्रथम येते. दरवर्षी अनेक पर्यटक ही आकाशाला भिडणारी इमारत पाहण्यासाठी दुबईमध्ये दाखल होतात. बुर्ज खलिफा इमारतीच्या उंचीवर गेल्यावर संपूर्ण दुबईचे दृश्य दिसते. रात्रीच्या अंधारात या इमारतीचे सौंदर्य रंगीबेरंगी दिव्यांनी उजळून निघते.
बुर्ज खलिफाची रचना-
बुर्ज खलिफा हे इस्लामिक स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. बुर्ज खलिफाशी संबंधित स्टॅक इफेक्ट किंवा चिमनी इफेक्ट ही एक घटना आहे जी बुर्ज खलिफाच्या संरचनेवर परिणाम करते. तसेच बुर्ज खलिफाच्या बांधकामाची सुरवात 6 जानेवारी 2004 रोजी सुरू झाली. व पूर्ण झाल्यानंतर बुर्ज खलिफाने जगातील सर्वात उंच मानवनिर्मित कलेचा दर्जा प्राप्त केला. तसेच या उंच अश्या बुर्ज खलिफामध्ये 58 लिफ्ट आहे. बुर्ज खलिफामध्ये 2957 पार्किंग स्पेस आणि 900 अपार्टमेंट आणि 304 हॉटेल्स आहे. सुरुवातीला बुर्ज खलिफा हे बुर्ज दुबई म्हणून ओळखले जात असे. बुर्ज खलिफा इमारतीमध्ये जमिनीच्या खाली आणि जमिनीच्या वर 163 इमारती बांधल्या आहे. तसेच आतून बुर्ज खलिफाला भेट देण्यासाठी प्रवेश शुल्क भरावे लागते.
बुर्ज खलिफा दुबई जावे कसे?
दुबईतील बुर्ज खलिफाला भेट देण्यासाठी भारतातील आंतरराष्ट्रीय विमानाने जाऊ शकता. दुबई विमानतळावरून बुर्ज खलिफा पर्यंत तुम्ही टॅक्सी किंवा कोणतीही स्थानिक वाहतूकची मदत घेऊ शकता.