या वस्तुंना साठवून ठेवणं महागात पडू शकतं

शनिवार, 27 फेब्रुवारी 2021 (08:30 IST)
काही लोकांची सवय असते की त्यांना वर्षातून किमान एकदा तरी घरातल्या वस्तू भरलेल्या पाहिजेत .ही एक जुनाट परंपरा आहे जी पिढ्यान पिढया चालू आहे. ज्यावेळी स्त्रिया बघतात की कोणत्याही वस्तू कमी किमतीत बाजारपेठेत उपलब्ध आहेत तेव्हा ते पैसे वाचविण्याच्या फायद्यासाठी मोठ्या प्रमाणात विकत घेतात, परंतु काही काळानंतर त्या वस्तू खराब होतात आणि नुकसान होत. म्हणून हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे की काय विकत घ्यावे आणि काय नाही. चला तर मग जाणून घेऊ  या .
 
* मसाले- 
मसाले एकदाच एका वर्षात विकत घेणे योग्य नाही. खरं तर सहा महिन्यातच मसाले आपली चव गमवायला सुरुवात करतात. ते फिकट होऊ लागतात. दररोज कमी प्रमाणात लागणारे मसाले खरेदी करा. गॅस जवळ मसाले ठेवू नका. त्याचा रंग,चव,सुगंध कमी होऊ लागतात.   
 
* साधारणपणे सनस्क्रीनवर दोन ते तीन वर्षांची मुदत असते, परंतु तरीही एक मोठी बाटली खरेदी करू नका कारण तीन वर्ष सनस्क्रीन खराब न होण्याची हमी दिलेली असते, जेव्हा ती उष्ण तापमानात ठेवलेली असते तेव्हा हळू-हळू खराब होण्यास सुरुवात होते. चुकून उन्हात किंवा स्विमिंग पुलाच्या जवळ सनस्क्रीन ठेवल्यावर त्वचेवर परिणाम करते.  
 
* तेल - 
बऱ्याच लोकांची सवय असते की ते स्वयंपाकघरात लागणारे तेलाचा वर्षाचा साठा करून ठेवतात.6 महिनेच तेलाची मुदत असते  जास्त काळ तेल ठेवल्याने आरोग्यावर परिणाम होऊ लागतो म्हणून जास्त खाद्य तेल खरेदी करू नका.
 
* अंडी -
जर आपल्या घरात दररोज न्याहारीत अंडी खात असाल तर त्यासाठी मोठी ट्रे विकत आणणे योग्य नाही. अंडी जास्त काळ टिकत नाही तीन ते पाच आठवडे अंडी फ्रीजमध्ये चांगले राहतात. म्हणून अंडी नेहमी आपल्या गरजेप्रमाणेच आणा.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती