स्मार्ट शॉपिंग करण्यासाठी सोप्या टिप्स

गुरूवार, 25 फेब्रुवारी 2021 (09:45 IST)
सुपरमार्केट मधून खरेदी करणे फायदेशीर असते. वेळे अभावे एकाच ठिकाणी सामान मिळते. पण बऱ्याच वेळा सुपरमार्केट मध्ये गर्दी मुळे किंवा तिथे असलेल्या सामानाच्या निवडीमुळे त्रस्त होतो. अशा परिस्थितीमध्ये आपण अधिक पैसे खर्च करतो. परंतु या काही सोप्या टिप्स मुळे आपली खरेदी सोपी होऊ शकते.चला जाणून घेऊ या टिप्स 
 
* रविवार खरेदीसाठी टाळा-
सुपर मार्केट खरेदी करण्यासाठी सर्वात सोपी युक्ती आहे की आपण रविवारी खरेदी कारणे टाळावे. या दिवशी गर्दी असते आणि सूट किंवा सवलत देखील मिळत नाही. एखाद्या सुपरमार्केट्मधे बुधवारी सूट देण्यात येते. अशा परिस्थितीत आठवड्याच्या इतर दिवशी खरेदी करा. 
 
2  खरेदी साठी यादी करा- 
सर्वप्रथम आपले बजेट तयार करा आणि दुसरे म्हणजे की खरेदी करण्यासाठी यादी तयार करा. यादी आपल्याकडे असेल तर ठराविक गोष्टीच खरेदी केल्या जातात. प्रत्येक सामान तपासून बघा. अशा परिस्थितीत जास्तीचे पैसे देखील खर्च होणार नाही. तसेच अतिरिक्त सामान देखील घरात येणार नाही. 
 
3 उपाशी खरेदीला जाऊ नये- 
उपाशी खरेदीला गेल्यावर आपण खाण्यापिण्याचे अतिरिक्त सामान खरेदी कराल . भूक लागलेली असल्यामुळे या सामानात स्नॅक्स रेडी टू इट फूड सारख्या सामानाचा समावेश असेल. या साठी आपल्याला जास्तीचे पैसे मोजावे लागतील.
 
4 स्वतःची पिशवी जवळ बाळगा -
आजकाल सुपरमार्केटवाले पिशवीसाठी अतिरिक्त शुल्क आकारतात. आपण त्या पिशव्या घरी आणून कोणत्याही हेतूसाठी वापरतो. त्या बॅग्स खरेदीला गेल्यावर जवळ बाळगा आणि खरेदी करा. असं केल्याने आपल्याला जास्तीचे पैसे खर्च करावे लागणार नाही.
 
5 मीट आणि डेयरी पदार्थांची खरेदी शेवटी करा-
जर आपण सुपरमार्केट्मध्ये खरेदी करत आहात तर मीट आणि दुधाचे पदार्थ शेवटी खरेदी करा. अन्यथा ते पदार्थ थंडावा नसल्यामुळे खराब होऊ शकतात.
 
6 डिस्काउंट किंवा लॉयल्टी कार्यक्रमाचा भाग व्हा- 
एकाद्या सुपरमार्केटच्या डिस्काउंट कार्यक्रमाचा भाग बना. जेणे करून आपल्याला मिळणाऱ्या सवलतीची माहिती मिळत राहील. या साठी आपण त्या सुपरमार्केट्चे कार्ड देखील बनवू शकता.या मध्ये मोबाईल नंबर ची नोंदणी करून बरेच पर्याय सहज मिळू शकतात जे आपल्याला एसएमएस द्वारे कळतील.  
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती