गरोदरपणात कार चालविणे आणि सीट बेल्ट बांधणे किती योग्य
बुधवार, 24 फेब्रुवारी 2021 (21:53 IST)
सर्वांना हे माहिती आहे की गरोदरपणाचे दिवस किती नाजूक आणि अवघड असतात. परंतु या साठी आपण सामान्य दिनचर्या थांबवू शकत नाही. या काळात दररोज सामान्य आयुष्य जगावेच लागते. काही महिला या काळात ऑफिसात जातात आणि या साठी त्या कारचा वापर करतात. या अवस्थेत कार चालविणे योग्य आहेत का किंवा सीट बेल्ट बांधणे योग्य आहे का? चला तर मग जाणून घेऊ या.
* कार चालवणे योग्य आहे का?
गरोदरपणाच्या सुरुवातीचा काळात आणि शेवटच्या आठवड्यात प्रवास करणे टाळावे. जर डॉक्टरांनी आपल्याला या अवस्थेत बेडरेस्ट सांगितली आहे, तर आपण कार चालविणे टाळावे.परंतु जर परिस्थितीच उद्भवली असेल तर सावधगिरी बाळगावी. जिथे आवश्यक असेल गाडी थांबवून विश्रांती घ्या.
* कार मध्ये आरामदायक कसे राहावे-
बऱ्याच काळ एकाच अवस्थेत बसून पाय आणि पाउलांना सूज येते म्हणून लांबचा प्रवास असल्यास थोड्या वेळ विश्रांती घ्या. या अवस्थेत वारंवार लघवी होण्याची समस्या देखील होते. लघवी रोखू नका. लघवी आल्यावर लगेच स्वच्छतागृहात जावे.
प्रवासामध्ये काही स्नॅक्स जवळ बाळगा.उंच टाचेच्या चपला घालणे टाळा.
* सीट बेल्ट लावता येईल का?
प्रवासादरम्यान सीटबेल्ट लावण्याचा सल्ला दिला जातो. आपण गरोदर आहात आणि आपल्याला सीटबेल्ट लावायचे आहे तर सीटबेल्ट सैलसर लावा जेणे करून पोटाला घट्टपणा जाणवू नये.
* गाडी चालवताना काय करावे ?
जर आपले कार्यालय जवळ असेल तर स्वतः गाडी चालवू शकता परंतु ऑफिस दूर असेल तर या टिप्स ची मदत घ्या.
*ज्यूस आणि पाणी जवळ ठेवा. कोणत्याही परिस्थितीत पाण्याची कमतरता होऊ देऊ नका.
* लांबच्या प्रवासात स्वतः ड्रायव्हिंग करणे टाळा.
* सीटच्या मागे आरामदायक उशी ठेवा.
* आपली सर्व औषधे आणि आवश्यक वस्तू कार मध्ये ठेवा.
* लांब सहलीला जाण्यापूर्वी तपासणी करवून डॉक्टरांचा सल्ला घ्या.
गरोदरपणात गाडी चालवून प्रवास पूर्ण करू शकता.हे गर्भवती महिलांसाठी सुरक्षित आहे परंतु लांबच्या प्रवासात जाण्यापूर्वी काही तयारी आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. हे आपल्या बाळासाठी आणि आपल्यासाठी फायदेशीर ठरेल.