स्वादिष्ट आणि आरोग्यदायी Chicken Manchow Soup रेसिपी

Webdunia
शनिवार, 18 जानेवारी 2025 (12:13 IST)
साहित्य-
चिकन - 300 ग्रॅम
तेल  
आले
लसूण  
कांदा  
हिरवी मिरची
कोबी  
गाजर  
शिमला मिरची  
चिकन स्टॉक
सोया सॉस - 2 टेबलस्पून
मिरे पूड  - 1 टीस्पून
मीठ - 1/2 टीस्पून
रेड चिली सॉस - 1/2 टीस्पून
व्हिनेगर - 1 टीस्पून
एग वॉश - 1
कॉर्नफ्लोर  
कोथिंबीर  
पाणी  
ALSO READ: क्रिस्पी थ्रेड चिकन रेसिपी
कृती-
सर्वात आधी एका पॅनमध्ये पाणी, चिकन, आले, लसूण, कांदा, गाजर घालावे आणि उकळी आणुन घ्यावी. नंतर चिकन पाण्यातून काढून त्याचे छोटे तुकडे करावे. आता दुसऱ्या पॅनमध्ये तेल गरम करून आणि त्यात आले, लसूण, हिरव्या मिरच्या घालून परतवून घ्यावे. आता कोबी, गाजर, सिमला मिरची घालून शिजवून घ्यावे. नंतर चिकन स्टॉक, सोया सॉस, काळी मिरी, मीठ, लाल मिरची सॉस, व्हिनेगर,  चिरलेले चिकन, अंडी मिक्स करावे व शिजवून घ्यावे. आता एका एका भांड्यात कॉर्नफ्लोर आणि पाणी मिक्स करून या मिश्रणात घालावे. व उकळवून घ्यावे. नंतर कोथिंबीर गार्निश करावी. तर चला तयार आहे आपले स्वादिष्ट आणि आरोग्यदायी Chicken Manchow Soup गरम नक्कीच सर्व्ह करा.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

संबंधित माहिती

पुढील लेख