डिनर विशेष रेसिपी पालक कीमा

मंगळवार, 7 जानेवारी 2025 (12:45 IST)
साहित्य-
चिकन मिन्स - अर्धा किलो
पालक- एक किलो चिरलेला
कांदा - दोन बारीक चिरलेले  
टोमॅटो - चार बारीक चिरलेले
आले लसूण पेस्ट - एक चमचा
हिरवी मरीची - तीन तुकडे केलेली
चवीनुसार मीठ
हळद - एक चमचा
तिखट - एक चमचा
चिकन बटर मसाला- दोन चमचा
तूप - चार चमचे

कृती-
सर्वात आधी सर्व साहित्य तयार करा. चिकन स्वच्छ धुवून बारीक करावे. आता कुकरमध्ये तूप घालावे मिरची तुकडे आणि कांदा घालून परतवून घ्यावे. आता चिकन, टोमॅटो, आले लसूण पेस्ट घालावी. नंतर यामध्ये पालक घालावा. तसेच सर्व मसाले घालून झाकण लावावे. दोन शिट्टी झाल्यानंतर गॅस बंद करवा. आता बाऊलमध्ये काढून त्यावर कोथिंबीर गार्निश करावी.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीचीपूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत ​​नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Edited By- Dhanashri Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती