कोणत्याही नात्यात बांधण्यासाठी एकमेकांना चांगले ओळखणे आवश्यक आहे. असे अनेकदा घडते की लोक नात्यात जुडतात. त्यांचे सुरुवातीचे दिवस आनंदात जातात. त्यांच्यात प्रेम वाढू लागते पण हळूहळू जोडीदाराच्या अशा काही गोष्टी किंवा सवयी कळतात ज्या मुलींना अजिबात आवडत नाहीत.त्यामुळे आपसातील संबंध खराब होतात आणि ब्रेकअप होऊ शकते. असं होऊ नये या साठी या चार गोष्टी करणे टाळावे. जेणे करून मुलगी आपले प्रेम नाकारू नये. चला तर मग जाणून घेऊ या.
1 भांडण करणे आणि रागावणे - ही बर्याच मुलांची सवय असते की ते खूप भांडतात. त्यांच्या नाकावर राग असतो. लहान सहान गोष्टींवर रागावणे, ओरडणे, बोलणे, मारहाण करण्याची त्यांना सवय असते. कॉलेज-ऑफिसमध्ये सर्वत्र त्यांच्या रागीट स्वभावामुळे त्यांची प्रतिमा खराब होते.आणि अशा मुळे आपल्याला आवडत असलेल्या मुलीसमोर आपली प्रतिमा खराब होऊ शकते. त्यामुळे भांडण आणि मारहाणीची सवय असल्यास त्वरितच बदला.
4 अस्वच्छता-अनेक पोरांची खोली नेहमीच अस्वच्छ असते. मुले धूळ, घाणेरडे कपडे आणि बूट विखुरलेले ठेवतात किंवा स्वतःला आणि घराला अस्वच्छ ठेवतात. त्यामुळे त्याचा लूकही खराब दिसतो. स्वच्छता न ठेवणारे मुले मुलींना आवडत नाहीत.