Mother-Daughter Relationship :प्रत्येक आईने आपल्या मुलीला या चार गोष्टी सांगाव्यात, आयुष्य सोपे होईल

मंगळवार, 7 डिसेंबर 2021 (22:05 IST)
नातेसंबंधांच्या बाबतीत, आईचे तिच्या मुलांशी सर्वात प्रेमळ आणि खरे नाते असते. मुलगा असो वा मुलगी, आई आपल्या मुलांवर सारखेच प्रेम करते, पण तिचे आपल्या मुलींशी असलेले नाते वेगळे असते. आईसाठी, तिची मुलगीच तिच्या जवळची  मैत्रीण असते. मुलींच्या बालपणापासून ते आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यापर्यंत आई तिच्या स्वप्नात जगते. मुलीचे संगोपन ही केवळ आईची जबाबदारी किंवा मातृत्व नसते, तर ती तिच्या माध्यमातून आपले बालपण पुन्हा जिवंत करत असते.
 
प्रत्येक आईलाही आपल्या मुलीला जगातील वाईट गोष्टींपासून दूर ठेवायचे असते आणि तिला उंच भरारी घेतांना पाहायचे असते. जर तुम्ही देखील आई असाल आणि तुमच्या मुलीबद्दल काही अशीच भावना किंवा काळजी असेल तर तुम्ही तुमच्या मुलीला मोठी झाल्यावर या चार गोष्टी सांगा. जर मुलगी शाळेतून कॉलेजात आली असेल किंवा अभ्यासासाठी किंवा नोकरीसाठी घर आणि कुटुंबापासून दूर जात असेल तर तिला या चार गोष्टी नक्कीच शिकवा.हे तिच्या आयुष्यात कामी येईल. 
 
1 मुलीला जबाबदारीची जाणीव करून द्या- जोपर्यंत मुलगी घरात असते तोपर्यंत तिला तिचे वडील आणि भावाचे संरक्षण मिळते. आईची माया मिळते. अशा परिस्थितीत, मुलीला तिच्या स्वतःबद्दलच्या जबाबदाऱ्या समजत नाहीत. पण ती जेव्हा मोठी होऊन शाळेतून कॉलेज जीवनात येते तेव्हा तिची जबाबदारी काय असते हे सांगायलाच हवे. तुमच्या मुलीला सांगा की तिची स्वतःची सुरक्षा तिची पहिली जबाबदारी आहे. काहीही करण्यापूर्वी, आपल्या सुरक्षिततेचा विचार नक्की  करावा .
 
2 मित्रांची निवड काळजीपूर्वक करा - मुलगी जेव्हा महाविद्यालयीन जीवनात प्रवेश करते तेव्हा आईने तिला सांगितले पाहिजे की चांगल्या मित्रांची परीक्षा कशी होते. चुकीचे मित्र निवडणे किती हानिकारक असू शकते? मुलीला मित्र बनवण्याचा सल्ला द्या, परंतु तिला निश्चितपणे सांगा की मित्रांची निवड काळजीपूर्वक करा. आपल्या मित्रांशी कसे वागावे हे देखील तिला सांगावे. 
 
3 मुलीचे मनोबल वाढवा- आईनेही आपल्या मुलीला जाणीव करून द्यावी की तिचा आपल्यावर किती विश्वास आहे आणि प्रत्येक योग्य पाऊलावर ती मुलीच्या सोबत आहे. आयुष्याच्या नव्या टप्प्याला धैर्याने सामोरे जायला शिका. तुम्हाला काही अडचणी येत असतील तर कुटुंबाला, विशेषत: तुमच्या आईला जरूर सांगा, जेणेकरून मिळून त्या संकटातून बाहेर पडता येऊ शकेल.  याशिवाय कधी अपयशाला सामोरे जावे लागले तर कमजोर होऊ नका, खचून जाऊ नका.तर यशासाठी पुन्हा प्रयत्न करायला शिका.
 
4 प्रेमाबद्दलही बोला - मुली जसजशा मोठ्या होऊ लागतात, तसतशी वयानुसार त्यांची एखाद्या विशिष्ट मित्राशी जवळीक वाढणे स्वाभाविक आहे. तुमच्या मुलीच्या आयुष्यातही ब्रेकअप आणि क्रश येऊ शकतात. याबद्दल पेनिक होऊ नका, मुलीला या पासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करू नका. त्यापेक्षा मित्रांप्रमाणे तुमच्या मुलीला तिच्याया भावनांबद्दल काही महत्त्वाचा सल्ला द्या. तिला सांगा की आयुष्यात या गोष्टी आल्याने किंवा गेल्याने आयुष्य आणि अभ्यासावरही परिणाम होऊ नये. 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती