लग्नाचे बंधन जेवढे घट्ट असते तेवढेच नाजूक लग्नाच्या सुरुवातीचे दिवस असते. दोन व्यक्तींमधील नाते जोडल्यानंतर दोघेही एकमेकांना समजून घेण्याच्या टप्प्यात येतात . हा केवळ वधू आणि वर यांच्यातील समजूतदारपणाचा एक महत्त्वाचा काळ नाही तर दोन्ही कुटुंबांसाठी देखील असतो. नातेसंबंध जुळल्यापासून ते लग्नापर्यंत अनेक विधी असतात. पहिलाच समारंभ ज्यामध्ये मुलगा आणि मुलगी पहिल्यांदा एकत्र येतात तो काळ म्हणजे एंगेजमेंट. एंगेजमेंट किंवा साखरपुडा ते लग्न यादरम्यानचा काळ हा सुवर्णकाळ मानला जातो. हाच तो काळ असतो जेव्हा मुलगा आणि मुलगी यांना एकमेकांना समजून घेण्याची संधी मिळते. दोघेही लग्नाआधी आपापल्या नात्यात सहजतेने राहण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा सहज राहण्याच्या नादात ते अनवधानाने चूक करतात की लग्नही मोडते. एंगेजमेंट नंतर, जर आपण लग्नाचा दिवस येण्याची वाट पाहत असाल तर,साखरपुडा झाल्यावर थोडे सावध राहा. काही निष्काळजीपणा किंवा चुका आहेत ज्या टाळल्या पाहिजेत.नाही तर नाते तुटून लग्न मोडू शकते.
1 हक्क गाजवणे- बऱ्याच वेळा एंगेजमेंट नंतर मुलं आपल्या होणाऱ्या जोडीदारावर हक्क गाजवतात. ते असे वागतात जणू ती त्यांची बायको आहे. आणि ते मुलीवर हक्क गाजवू लागतात. लक्षात ठेवा की आपली एंगेजमेंट झाली आहे लग्न नाही. सध्या मुलगी तिच्या वडिलांच्या सानिध्यात आहे, त्या मुळे ती स्वतंत्र आहे. तिच्यावर आपले हक्क गाजवू नका. मुलींना असे वाटते की लग्नानंतर पती त्यांच्या भावना समजून घेणार नाही. आणि नातं तुटायला वेळ लागणार नाही.
4 जोडीदाराला सन्मान द्या-प्रत्येक मुलीला तिच्या आयुष्याच्या जोडीदाराकडून आदराची अपेक्षा असते. एंगेजमेंट झाल्यावर दोघं बोलायला सुरुवात करतात. या दरम्यान, जर आपले बोलणे आणि वागणे असे असेल की आपल्या होणाऱ्या जोडीदाराला असे वाटेल की आपण तिचा आदर करत नाही, तर हे प्रकरण लग्नापर्यंत पोहोचू शकणार नाही. आणि नातं तुटेल. म्हणून आपल्या होणाऱ्या जोडीदाराला सन्मान द्या.