* तूर डाळ, चणा डाळ, मूग मोगर जरा-जरा प्रमाणात घ्यावी. धणे, जिरा, हिंग, मेथीदाणा, काळीमिरी, अख्ख्या लाल मिरच्या, सुंठ हे सर्व पदार्थ भाजून घ्यावे. मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. आता स्वाद बदलण्यासाठी, रसदार भाज्यांची ग्रेव्ही घट्ट करण्यासाठी आपण हे मिश्रण वापरू शकता.
* भाज्यांचा स्वाद बदलण्यासाठी यात लोण्याचा मसाला टाकावा.
* चिंचेच्या चटणीसाठी गूळ आणि चिंच वेगळ्याने भिजवावे. नंतर चोळून त्या मिश्रणाला हलकं बेसन लावून उकळी घ्यावी. चटणी लवकर घट्ट होईल.