फळं आणि भाज्यांवर हानिकारक घटकांचा एक थर असतो. थर कीटकनाशक, धूळ आणि जिवाणूंचा असू शकतो. नुसतं एकदा पाण्याने धुतल्याने हे स्वच्छ होत नाही कारण पाणी फक्त 20 टक्के कीटकनाशक साफ करू शकतं. परिणामस्वरूप पोटाचे विकार व इतर गंभीर आजार होण्याची शक्यता असते. तसेच ऑरगॅनिक फूड असले तरी पिकवताना कीटनाशक वापरलेली असू शकतात. तर जाणून घ्या कसे स्वच्छ कराल फळं आणि भाज्या.