अनेक वेळेस महिला चिंतीत असतात की क्रिमी दूध मागवल्यानंतर देखील दुधावर हवी तशी जाड लेयर असलेली साय जमा होत नाही. म्हणून आज आपण काही घरगुती टिप्स पाहणार आहोत ज्यामुळे दुधावर जाड लेयर असलेली आणि घट्ट अशी साय येईल. तर चला जाणून घेऊ या कोणत्या आहे घरगुती टिप्स.
दूध उकळण्याची योग्य पद्धत-
दुधावर घट्ट साय हवी असल्यास फुल क्रिमी दूध घ्यावे. तसेच अनेक लोक फ्रिज मधून दूध काढल्यानंतर लागलीच तापवतात. तर असे करायचे नाही. दूध थोडावेळ बाहेर काढून ठेवावे. मग गरम करावे. व दूध तापल्यानंतर लागलीच गॅस बंद करू नये. तर लहान गॅस करून काही वेळ उकळून घ्यावे. यामुळे दुधावर घट्ट आणि जाड अशी साय तयार होते.
गरम दुध झाकू नये-
नेहमी दुधावर जाळीदार प्लेट ठेवावी. तसेच गरम दूध झाकू नये. यामुळे साय तयार होत नाही. दूध झुकतांना नेहमी जाळीचा उपयोग करावा.
दूध उकळतांना चमच्याने ढवळत राहावे-
दूध तापल्यानंतर गॅस कमी करून पाच मिनिट दूध चमच्याने हलवावे. त्यानंतर थंड झाल्यानंतर फ्रिजमध्ये ठेऊन द्यावे. गरम दूध कधीही फ्रिजमध्ये ठेऊ नये.
अस्वीकरण (Disclaimer) : या लेखात दिलेली माहिती आणि उपाय सामान्य माहितीवर आधारित आहे.या माहितीची पूर्णता, विश्वासार्हता आणि अचूकता याबाबत वेबदुनिया कोणतीही हमी देत नाही. अधिक माहितीसाठी संबंधित तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.