गावातील सर्व लोक त्याचा तिरस्कार करायचे. कोणीही त्याच्याजवळ जायचे नाही. एक दिवस नानक देव जी त्याच्याजवळ गेले व त्याला म्हणाले की, दादा मी आम्ही आज तुझ्या झोपडीमध्ये राहू इच्छित आहे. जर तुला काही समस्या नसेल तर आम्ही इथे राहू का? आता कुष्ठरोगी आश्चर्यचकित झाला कारण कोणीही त्याच्या जवळ येऊ जायचे नाही. मग त्याच्या घरात राहणे कोणी कसे मान्य केले? कुष्ठरोगी त्याच्या आजारामुळे इतका दु:खी झाला होता की त्याला इच्छा असूनही काही बोलता येत नव्हते. फक्त गुरुजींकडे पाहत राहिले. तसेच पाहता पाहता त्याच्या शरीरामध्ये बदल व्हायला लागले पण त्याला बोलता येत न्हवते.
गुरुजी म्हणाले तू ठीक आहेस ना, गावाबाहेर झोपडी का बांधलीस? कुष्ठरोगी म्हणाला, 'मी खूप दुर्दैवी आहे, मला कुष्ठरोग झाला आहे, माझ्याशी कोणी बोलत नाही, माझ्या घरच्यांनीही मला घराबाहेर काढले आहे. मी वाईट आहे. म्हणूनच माझ्या जवळ कोणी येत नाही.
माझ्याकडे ये, मला बघू दे. तुझा कुष्ठरोग कुठे आहे? गुरुजींनी हे शब्द सांगताच कुष्ठरोगी गुरुजींच्या जवळ आला आणि देवाची कृपा झाली की कुष्ठरोगी पूर्णपणे बरा झाला. ते पाहून तो गुरुजींच्या पाया पडला. गुरुजींनी त्याला उचलून मिठी मारली आणि म्हणाले की, 'देवाचे स्मरण करा आणि लोकांची सेवा करा, हे मानवी जीवनाचे मुख्य कार्य आहे.'