हितोपदेशातील मनोरंजक कथा : माकड आणि घंटा

गुरूवार, 7 नोव्हेंबर 2024 (20:30 IST)
अनेक वर्षांपूर्वीची गोष्ट आहे. एके दिवशी एका चोराने गावातील मंदिराची घंटा चोरली. घंटा चोरल्यानंतर तो जंगलाच्या दिशेने धावत सुटला. एक गुहेमध्ये अराम करीत असलेल्या वाघाने त्या घंटेचा आवाज ऐकला व त्याला तो आवाज खूप आवडला. लवकरच त्याने चोर आणि घंटेला शोधून काढले. वाघाने चोरावर हल्ला केला आणि त्याला ठार केले. घंटा जमिनीवर पडली व वाघ आपली शिकार खाण्यात दंग झाला. 
 
काही दिवसानंतर तिथून एक माकडांची टोळी जात होती. त्यांनी घंटेला पहिले व त्यांना घंटा फारच आवडली.माकड ती घंटा घेऊन खेळू लागले. ते दिवसभर फिरायचे व रात्री घंटा सोबत खेळायचे. 
 
गावातली लोक रोज रात्री येणाऱ्या घंटेचा आवाज ऐकून घाबरत होती.गावातील लोकांना चोराचा मृतदेह सापडल्याने ही बातमी पसरली की, जंगलात कोणीतरी राक्षस राहत आहे. जो लोकांना ठार केल्यानंतर घंटा वाजवतो. लवकरच गावामध्ये ही अफवा पसरली व लोक गाव सोडून पळून जायला लागले. 
 
त्या गावामध्ये एक आजीबाई राहायची तिला या गोष्टीवर विश्वास न्हवता. ती खूप धाडसी आणि शूर होती. तिने एक दिवस ठरवले की, मी या घंटेचा आवाजाचा मागोवा घेईल. व शोधून काढेल की, यामागचे नक्की कारण काय आहे. 
 
एक दिवस आजीबाई गावातील संरपंचांना म्हणाली की, सरपंच मला विश्वास आहे की, गावात गणेशपूजा केल्यास हा आवाज नक्कीच बंद होईल. पण याकरिता काही पैशांची आवश्यकता आहे. सरपंचानी पूजेकरिता पैसे दिले. 
 
चतुर आजीबाई ने फळे आणि मेवे विकत घेऊन गावातील मंदिरामध्ये पूजा केली. पूजा झाल्यानंतर आजीबाई सर्व साहित्य घेऊन जंगलच्या दिशेने गेली. तिने त्या जागी सर्व सामान नेऊन ठेवले जिथून रोज रात्री घंटेचा आवाज यायचा. व ती एका झुडपा मागे लपून बसली. 
 
आता रात्री सर्व माकडे परतली आणि त्यांची दृष्टी तिथे ठेवलेल्या फळांवर पडली त्यांनी हातातील घंटा खाली ठेवली व फळे खाण्यास सुरवात केली. त्याचवेळी चतुर आजीबाईच्या ती घंटा उचलली आणि पळत गावाच्या दिशेने आली. व सर्व गावाला आणि सरपंचांना घडलेली कहाणी सांगितली. व ती घंटा दाखवली. गावातील लोकांनी आजीबाईच्या धाडसीपणाचे कौतुक केले व आभार मानले. कारण आजीबाईच्या तिच्या शूरपणामुळे सर्व गावकऱ्यांची भीती दूर केली.  
तात्पर्य : कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवण्यापूर्वी आधी विचार करावा. 

Edited by - Dhanshree Naik

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती