आता यावर कुत्रा चिडून म्हणाला की, "काळजी करू नकोस ."तुला माहिती आहे, मी रात्रंदिवस घराचे रक्षण करतो, पण मालकाला माझी किंमत नाही. ठीक आहे, चोरी होऊ द्या, त्याचे नुकसान होईल, तेव्हाच त्याला माझी किंमत कळेल.
गाढवाला कुत्र्याचे म्हणणे पटले नाही. गाढवाने कुत्र्याला समजावण्याचा प्रयत्न केला पण हट्टी कुत्र्यावर काहीच परिणाम झाला नाही. आता मात्र गाढव खूप अस्वस्थ झाले. तो पुन्हा कुत्र्याशी वाद घालायला गेला नाही. त्याने,मालकाला मदत करावी असे ठरवले. म्ह्णून गाढव मोठ्या मोठ्याने ओरडू लागले. त्यामुळे चोर पळून गेलेत. पण धोबी गाढ झोपेतून जागा झाला आणि हातात काठी घेऊन बाहेर आला. तसेच कुत्रा शांत बसला होता आणि गाढव जोरात ओरडत होते. हे पाहून त्याला वाटले की गाढवाने आपली झोप भंग करण्यासाठी हे केले आहे. धोबीला खूप राग आला आणि त्याने गाढवाला खूप मारले. बिचारे गाढव अखेरीस चूक नसतांना गतप्राण झाले.