✕
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
ग्रह-नक्षत्रे
वास्तुशास्त्र
फेंगशुई
राशिभविष्य
जन्मदिवस आणि ज्योतिष
श्रीराम शलाका
टॅरो भविष्य
चौघड़िया
मासिक जुळत आहे
आजचा वाढदिवस
लाईफस्टाईल
प्रणय
सखी
योग
लव्ह स्टेशन
मराठी साहित्य
मराठी कविता
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
इतर खेळ
स्कोअरकार्ड
वेळापत्रक
आयसीसी रँकिंग
क्रीडा जग
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
Marathi
हिन्दी
English
தமிழ்
తెలుగు
മലയാളം
ಕನ್ನಡ
ગુજરાતી
महाराष्ट्र माझा
ज्योतिष
लाईफस्टाईल
धर्म संग्रह
आरोग्य
व्हिडिओ
डॉ.आंबेडकर
खाद्य संस्कृती
क्रिकेट
वास्तुशास्त्र
फ़ोटो गैलरी
शिवजयंती
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
Webdunia
शनिवार, 10 ऑगस्ट 2024 (11:38 IST)
गाई पाण्यावर काय म्हणुनी आल्या
का गं गंगा यमुनाही ह्या मिळाल्या
उभय पितरांच्या चित्तचोरटीला
कोण माझ्या बोलले गोरटीला
विभा विमला आपटे प्रधानांच्या
अन्य कन्या श्रीमान कुलीनांच्या
गौरचैत्रीची कशास जुनी येती
रेशमाची पोलकी छीटे लेती
तुला लंकेच्या पार्वतीसमान
पाहुनीया होवोनी साभिमान
काय त्यातील बोलली एक कोण
"अहा, आली ही पहां भिकारीण"
पंकसंपर्के का कमळ भिकारी?
धुलीसंसर्गे रत्न का भिकारी?
सूत्रसंगे सुमहार का भिकारी?
कशी तुही मग मज मुळी भिकारी?
लाट उसळोनी जळी खळे व्हावे
त्यात चंद्राचे चांदणे पडावे
तसे गाली हासता तुझ्या व्हावे
उचंबळूनी लावण्य बर वहावे
नारीमायेचे रुप हे प्रसिद्ध
सोस लेण्यांचा त्यास जन्मसिद्ध
तोच बीजांकुर धरी तुझा हेतू
विलासाची होशील मोगरी तू
तुला घेईन पोलके मखमलीचे
कूडी मोत्याची फूल सुवर्णाचे
हौस बाई पुरवीन तुझी सारी
परी यांवरी हा प्रलय महाभारी
प्राण ज्यांचे वर गुंतले सदाचे
कोड किंचीत पुरवीता नये त्यांचे
तदा बापाचे ह्र्दय कसे होते?
न ये वदता अनुभवी जाणती ते
देव देतो सद्गुणी बालकांना
काय म्हणुनी आम्हांस करंट्यांना?
लांब त्याच्या गावास जाऊनीया
गूढ घेतो हे त्यांस पुसूनीया
"गावी जातो" ऐकता त्याच गाली
पार बदलूनी ती बालसृष्टी गेली
गळा घालूनी करपाश रेशमाचा
वदे, "येते मी, पोर अज्ञ वाचा"
कवी- कवी बी(नारायण मुरलीधर गुप्ते)
वेबदुनिया वर वाचा
मराठी ज्योतिष
लाईफस्टाईल
बॉलीवूड
मराठी बातम्या
संबंधित माहिती
गडद निळे
अ आ आई, म म मका
सांग मला रे सांग मला
घाल घाल पिंगा वाऱ्या
बाळ, चालला रणा
सर्व पहा
नक्की वाचा
Hariyali Teej 2025 हरियाली तीज व्रत कधी? साजरा करण्याची पद्धत आणि महत्त्व जाणून घ्या
आतापासून १३८ दिवस या ३ राशींना शनीच्या वक्री हालचालीचा फायदा होणार
पावसाळ्यात तांदळाच्या पाण्यामुळे उजळती त्वचा मिळेल, असे वापरा
पावसाळ्यात वांगी का खाऊ नये,खाल्ल्यास काय होते?
मानेचे कुबड कमी करण्यासाठी हे योगासन करा
सर्व पहा
नवीन
निरोगी नात्यासाठी या 2 गोष्टींकडे लक्ष द्या, नाते दीर्घकाळ टिकेल
जातक कथा : बुद्धिमान भिकारी
मसालेदार रोस्ट चिकन रेसिपी
अगदी बाजारा सारखा सांबार मसाला घरी बनवा, लिहून घ्या रेसिपी
पपईचा रस पिण्याचे आरोग्यदायी फायदे जाणून घ्या
पुढील लेख
World Lion Day 2024 जागतिक सिंह दिन का साजरा केला जातो? इतिहास जाणून घ्या