हिवाळ्याच्या हंगामात सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपली प्रतिकारक शक्ती मजबूत राखणे, जेणे करून हंगामी रोग टाळता येऊ शकेल. तसं तर या हंगामात खाण्या-पिण्यासाठी बऱ्याच गोष्टी उपलब्ध असतात, पण असं काय खावं जेणे करून शरीरास निरोगी ठेवता येईल, हा एक मोठा प्रश्न आहे.
मुळा शरीराच्या रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्याचे काम करतं. वास्तविक यामध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी आढळंत, जे आपल्याला हिवाळ्यात होणाऱ्या सर्दी पडसं पासून वाचण्यात मदत करतं. आपण दररोज याचा सेवन केल्यानं आजारापासून वाचू शकाल.
मुळाच्या सेवनाने हृदय रोगाच्या धोका कमी होतो. वास्तविक हे अँथोसायनिनचा चांगला स्रोत आहे, ज्याचा अभ्यास बऱ्याच जणांनी केला आहे आणि तज्ज्ञांचा असा विश्वास आहे की हा हृदयरोगाचा प्रादुर्भाव कमी करण्याशी संबंधित आहे.