दिवाळीमध्ये दम्याच्या रुग्णांनी या 5 गोष्टींची काळजी घ्यावी

शनिवार, 7 नोव्हेंबर 2020 (16:52 IST)
दिवाळीच्या सणाची अगदी सगळेजण उत्सुकतेने आणि आतुरतेने वाट बघतात. त्यासाठीची जय्यत तयारी देखील सुरू होते. सर्वांचा उत्साह या सणासाठी द्विगुणित होतो. आपल्या घराला सजविण्यासाठी लोक आपल्या घराची स्वच्छता करतात. जाळे-जळमट काढतात. सगळी कडे धुळीचे वातावरण असतं. पण अशात दम्याच्या रुग्णांना आपल्या आरोग्याची काळजी घेणं गरजेचं असतं. 
 
स्वच्छतेमुळे आणि फटाक्यांमुळे त्यांना आरोग्याशी निगडित त्रासांना सामोरी जावं लागू शकतं. म्हणूनच या साठीची काळजी घेणं महत्त्वाचं आहे. चला जाणून घेऊ या काही महत्त्वाच्या टिप्स. 
 
1 घराच्या साफ स्वच्छतेपासून दूरच राहावं, शक्य असल्यास स्वच्छतेसाठी एखाद्या कामगाराची मदत घ्या. साफ स्वच्छता करताना धूळ कणांच्या संपर्कात येऊ शकता. जे आपल्यासाठी हानिकारक आहे.
 
2 जरी आपल्याला फुलबाज्या, अनार याची आवड असल्यास, आपल्या आरोग्याची काळजी घेत यापासून अंतर ठेवणं आवश्यक आहे. या पासून निघणारा धूर आपल्यासाठी त्रासदायी होऊ शकतो.
 
3 जास्त वेळ घरातच घालवणे योग्य आहे, कारण घराच्या बाहेर फटाक्यांचा धूर संपूर्ण वातावरणात पसरतो. घराच्या बाहेर राहण्याने आपल्याला त्या धुराचा त्रास होऊ शकतो आणि आपल्या आरोग्यास धोका संभवतो.
 
4 आपले इन्हेलर आणि औषधे नेहमी आपल्या जवळ बाळगा. आपल्याला कोणत्याही क्षणी याची गरज भासू शकते. अशा परिस्थिती, आवश्यक वेळी ते आपल्या बरोबर असायला हवं.
 
5 आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि खाण्या-पिण्याची विशेष काळजी घ्या. जास्त तेल आणि मसालेयुक्त अन्न घेणे टाळा. जास्तीत जास्त पाणी प्या. जेणे करून आपले शरीर हायड्रेट राहील.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती