स्मार्टफोनचा अती वापर केल्यानं धोकादायक आजार होऊ शकतात

शुक्रवार, 30 ऑक्टोबर 2020 (17:40 IST)
स्मार्ट फोनच्या जगात मागील 10 वर्षात मोठा बदल झाला आहे. आज प्रत्येक जण स्मार्टफोन वापरत आहे. आजच्या काळात स्मार्टफोन आणि डेटा हे ऑक्सिजन प्रमाणे काम करतात. जो बघा तो या स्मार्टफोनमध्ये सतत डोळे घालून बसत आहे. आपली जीवनशैलीच आता अशी झाली आहे की आपण कोणत्याही इलेक्ट्रॉनिक उपकरणांपासून दूर राहू शकत नाही. 
 
संशोधनात आढळून आले आहे की एखादा माणूस सतत स्मार्टफोनवर वेळ घालवल्यानंतर वयाच्या 50 व्या वर्षापर्यंत देखील आपले डोळे गमावू शकतो. हेच नव्हे तर डोळ्यांचे आजार देखील होऊ शकतात. 
 
ऑप्टिकल केमेस्ट्रीच्या संशोधनानुसार, निळा प्रकाश डोळ्यांच्या पडद्याचे मुख्य अणूंना सेल किर्ल मध्ये रूपांतरित करते. या मुळे आपल्या डोळ्यांवर त्याचा सखोल परिणाम होतो. अभ्यासामध्ये देखील असा दावा केला आहे की सतत निळ्या प्रकाशामुळे डोळ्यांचे आजार होऊ शकतात किंवा एखादा माणूस वयाच्या 50 व्या वर्षा पर्यंत डोळ्यांची दृष्टी गमावू शकतो.
 
हे कसे टाळता येईल -
अश्या परिस्थितीत आपण आपल्या स्मार्टफोनच्या सेटिंग मध्ये जाऊन ब्लु लाइट ऑन करू शकता. डिस्प्लेला उच्च प्रतीचे स्क्रीन प्रोटेक्टर वापरा. जर आपण लॅपटॉप किंवा कॉम्पुटर वर सतत काम करत असाल, तर वेळोवेळी आपल्या डोळ्याची तपासणी करावी. 
 
डॉक्टरांचा सल्ला घेऊनच चांगल्या प्रकारचे आय ड्रॉप वापरावे आणि मधून मधून डोळ्यांना विश्रांती देऊन डोळ्यांना थंड पाण्याने धुवावे. निळ्या प्रकाशाचा आणि युवी फिल्टरचा चष्मा वापरावा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती