काय सांगता, किवीने रोग प्रतिकारक शक्ती वाढते

गुरूवार, 12 नोव्हेंबर 2020 (10:18 IST)
किवी पोषक घटकांनी समृद्ध फळ आहे, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानले आहे. तसे तर या फळाचे मूळ स्थळ चीन आहे आणि जगभरात चीन हे किवीचे सर्वात मोठे उत्पादक आहे, परंतु आता जगभरातील सर्व लोक किवी चवीने खातात. याचे अनेक फायदे देखील आहे. या मध्ये अँटी बेक्टेरिअल आणि अँटी ऑक्सीडेन्टचे गुणधर्म आढळतात. जे आरोग्यासाठी खूपच फायदेशीर आहे. याचा उपयोग रक्तदाब नियंत्रित करण्यासाठी आणि डोळ्यांचा अंधुक पणाच्या त्रासापासून वाचण्यासाठी करतात. याचे इतर फायदे देखील आहे.
 
* असे म्हणतात की पोटाच्या दुखण्यापासूनच सर्व रोगांची सुरुवात होते, म्हणून पोटाला स्वच्छ आणि निरोगी ठेवणे फार महत्त्वाचे आहे. या साठी आपण किवीचे सेवन करू शकता. या मध्ये फायबर सह पोट स्वच्छ करण्याचे गुणधर्म आढळतात. याचा दररोज सेवन केल्याने बद्धकोष्ठते सारखे त्रास दूर होतात.
 
* अनिद्राचा त्रास असल्यास देखील किवी फायदेशीर आहे. हे सेरोटोनिन आणि फोलेटने समृद्ध आहे या मुळे अनिद्रा आणि न्यूरोसायकॅट्रिकच्या त्रासापासून मुक्त करतं. बऱ्याच अभ्यासामध्ये आढळले आहे की जर झोपण्याच्या एक तासा पूर्वी एक किंवा दोन किवी खालल्या तर झोपेच्या गुणवत्तेत सुधारणा होते.
 
* किवीचे सेवन देखील हृदयासाठी फायदेशीर आहे. अभ्यासानुसार किवी मध्ये असलेले व्हिटॅमिन, खनिजे, अँटीऑक्सीडेंट आणि पॉलिफेनॉल हृदयविकारांचा धोक्याला कमी करते. याचा दररोजच्या सेवनाने हृदय रोगाच्या त्रासापासून सुटका मिळू शकते.
 
* किवी रोग प्रतिकारक शक्ती वाढविण्यास देखील प्रभावी आहे. वास्तविक या मध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते जी आपली प्रतिकारक पेशींना बळकट करते आणि रोग प्रतिकारक शक्ती वाढवते. आपण रोग प्रतिकारक शक्ती बूस्टर फळ म्हणून दर रोज याचे सेवन करू शकता.  

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती