हिवाळ्यात बायकांनी या 9 गोष्टींकडे लक्ष द्यावे

बुधवार, 11 नोव्हेंबर 2020 (06:21 IST)
बदलत्या हंगामात महिलांनी सावधगिरी बाळगावी, अन्यथा निष्काळजीपणा महागात पडेल
 
हिवाळ्याचा हंगामा हा आरोग्य सुधारण्यासाठी सर्वोत्कृष्ट मानला जातो. जर या काळात बायकांनी आपल्या आरोग्याकडे लक्ष दिले तर संपूर्ण वर्ष त्यांना आपल्या आरोग्य राखण्यासाठीच काम करावे लागणार. या काळात विशेषतः स्त्रियांनी आपल्या दिनचर्येमध्ये थोडे बदल केले पाहिजे आणि त्यात काही अशा गोष्टी समाविष्ट केल्या पाहिजेत जेणे करून आपले आरोग्य सुधारेल.चला तर मग जाणून घेऊ या की या हंगामात कोणत्या सवयींना आपल्या दिनचर्येमध्ये समाविष्ट करावं.
 
1 व्यायामाला आपल्या दिनचर्येचा भाग बनवा.
 
2 व्यायाम जास्त कंटाळवाणी नसावे, या साठी दर रोज नवे काही करण्याचा प्रयत्न करा. जसे की सोमवारी वॉक, मंगळवारी योगा, बुधवारी व्यायाम इत्यादी. 
 
3 व्यायाम करताना आपल्या आवडीचे गाणे ऐकणे खूप महत्त्वाचे आहे. या मुळे मन आनंदी होतो आणि शरीरात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.
 
4 आहारात हिरव्या पाले भाज्या, फळे, सॅलड आणि रस नियमितपणे घ्यावे. तेलकट-तुपकट जास्त खाऊ नये. बायकांनी दररोज एक ग्लास दूध प्यावे.
 
5 कॅल्शियम आणि सोया असलेले खाद्य पदार्थ खावे.
 
6 बदलत्या हंगामात मॉइश्चरायझर वापरावे.
 
7 आपल्या त्वचेला निरोगी ठेवण्यासाठी कोरफडाचा वापर देखील करू शकतो.

8 दिवसभरात सुमारे 18 ते 20 ग्लास पाणी प्यायल्याने निम्म्याहून अधिक आजार दूर राहतात. व्हिटॅमिन, अँटी ऑक्सीडेंट औषधे घ्यावी.

9 जे खाल ते शिजवून खा, नेहमी धुऊनच खा. सर्दी-पडसं झालेल्या माणसांपासून दूर राहा. शक्य तितक्या रोगांपासून लांबच राहा.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती