सुरक्षित मातृत्व आठवडा विशेष : आईचे दूध बाळासाठी अमृत
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020 (10:15 IST)
15 ते 21 ऑक्टोबर पर्यंत सुरक्षित मातृत्व आठवड्यावरील विशेष दर वर्षी 15 ऑक्टोबर ते 21 ऑक्टोबर पर्यंत सुरक्षित मातृत्व आठवडा साजरा केला जातो. आईचे दूध बाळासाठी अमृत मानले आहे, जे बाळाचे प्रत्येक आजारापासून संरक्षण करतं. चला बाळाला दूध कसं पाजावं जाणून घेऊया..
1 बाळाला दूध पाजताना नेहमी आनंदी होऊन दूध पाजावे. राग आलेला असल्यास किंवा तणाव असल्यास बाळाला दूध पाजू नये.
2 बाळाला दूध पाजण्यापूर्वी आपल्या स्तनाग्राला स्वच्छ करून घ्या.
3 आईचे दूध बाळाला त्याच तापमानात दिले जाते जे शरीराचं तापमान असत. इतर बाहेरच्या दुधाप्रमाणे ह्याला गरम करण्याची गरज नसते.
4 बाळाला दूध पाजताना मांडी घालून बसावं. नंतर बाळाच्या डोक्याखाली आपले हात ठेवा आणि डोक्याला उंच उचला जेणे करून बाळाला सहजपणे दूध पिता येईल.
5 आईचे दूध शुद्ध, ताजे आणि निर्जंतुक असतं. हे बाळाला अनेक आजारापासून वाचवतं.
6 शक्य असल्यास आपण स्वतः बसूनच आपल्या मांडीत बाळाला निजवून दूध पाजावे. स्वतः निजून दूध पाजू नये.
7 बाळाला वरच्या म्हणजे बाहेरच्या दुधाची एलर्जी असू शकते पण आईच्या दुधामुळे एलर्जी होण्याची तक्रार होतं नाही.
8 बाळ दूध पीत असताना त्याला हसवू नये. यामुळे याला ठसका लागून नाकात दूध येण्याची शक्यता असते.
9 आईच्या दुधानेच बाळाचे भागत असल्यास म्हणजे त्याचे पोट भरात असल्यास त्याला वरचे म्हणजे बाहेरचे दूध देऊ नये.
10 आपल्या बाळाची सुरक्षा ही आईची पहिली जवाबदारी असते. म्हणून आपल्या बाळाची सर्वोपरीने चांगल्या प्रकारे काळजी घ्यावी.