अयोध्येत लागवड केलेल्या सुंदर आणि सुवासित असलेल्या पारिजातकाच्या फुलांना आपण सर्वांनी बघितलेच असणार. पण कधी आपण या पानांपासून बनविलेल्या चहा प्यायला आहात? किंवा यांचा फुलं, बियाणं किंवा सालींचा वापर आरोग्य आणि सौंदर्यासाठी किती फायदेशीर आहे जर हे आपणास ठाऊक नसल्यास तर जाणून घेऊ या याच्या चमत्कारिक औषधीय गुणधर्माची माहिती. हे माहीत झाल्यावर आपणांस आश्चर्य होणार..
पारिजातकाच्या फुलांपासून पानं, साली आणि बियाणं उपयुक्त आहे. याचा चहा, चविष्टच नव्हेतर आरोग्यास देखील फायदेशीर आहे. आपण हा चहा वेग वेगळ्या पद्धतीने देखील बनवू शकता आणि आरोग्य आणि सौंदर्याचे अनेक फायदे मिळवू शकता. जाणून घेऊ या आरोग्याच्या विविध समस्यांसाठी याचे फायदे आणि चहा बनविण्याची पद्धत -
कृती 1-
पारिजातकाचा चहा बनविण्यासाठी याचे दोन पानं आणि एक फुलासह तुळशीची पान घेऊन 1 ग्लास पाण्यात उकळवून घ्या. उकळल्यावर गाळून थंड करून किंवा कोमट पिऊन घ्या. चवीनुसार मध किंवा खडी साखर देखील घालू शकता. हे खोकल्यासाठी फायदेशीर आहे.
कृती 2 -
पारिजातकाची 2 पाने आणि 4 फुलांना 5 ते 6 कप पाण्यात उकळवून, 5 कप चहा सहज बनवू शकतो. या मध्ये दुधाचा वापर करत नाही. हे उत्साह वाढवतं.
चहाच्या व्यतिरिक्त पारिजातकाच्या झाडाचे अनेक औषधी फायदे आहे जाणून घेऊ या कोणत्या आजारात हे कसं वापरावं
1 सांधे दुखी - पारिजातकाचे 6 ते 7 पाने तोडून बारीक वाटून घ्या. वाटून या पेस्टला पाण्यात घालून पाण्याची मात्रा कमी होण्यापर्यंत उकळवून घ्या आणि थंड करून दररोज सकाळी अनोश्यापोटी प्यावं. नियमाने असे केल्यास सांध्यांशी निगडित इतर समस्या नाहीश्या होतील.
2 खोकला - खोकला आणि कोरड्या खोकल्यासाठी पारिजातकाच्या पानांना पाण्यात उकळवून प्यायल्याने खोकला नाहीसा होतो. आपली इच्छा असल्यास याला साधारण चहामध्ये उकळवून किंवा बारीक वाटून मधासह देखील घेऊ शकता.
3 ताप - कोणत्याही प्रकाराचा ताप असल्यास पारिजातकाच्या पानांचा चहा पिणं खूप फायदेशीर असतं. डेंग्यूच्या तपासून ते मलेरिया किंवा चिकनगुनियापर्यंत कोणत्याही तापाचा नायनाट करण्याची क्षमता यामध्ये असते.
4 सायटिका : दोन कप पाण्यात पारिजातकाचे सुमारे 8 ते 10 पानं मंद आंचेवर अर्ध होईपर्यंत उकळावे. थंड करून सकाळ संध्याकाळ अनोश्या पोटी प्यावं. एका आठवड्यात आपणास फरक जाणवेल.
5 मूळव्याध - पारिजातकाची पानं मूळव्याध किंवा पाईल्स साठी एक चांगले औषध मानले जाते. या साठी पारिजातकाच्या बियाणं घेणं किंवा त्याची पेस्ट बनवून त्या जागीस लावल्याने फायदेशीर असतं.
6 त्वचेसाठी - पारिजातकाची पाने वाटून लावल्याने त्वचेशी निगडित त्रास नाहीसे होतात. याचा फुलाची पेस्ट बनवून लावल्याने चेहरा उजळ आणि चमकदार होतो.
7 हृदय रोग - हृदयाच्या आजारामध्ये पारिजातकाचे वापर फायदेशीर असतं. याचा 15 ते 20 फुलांच्या रसाचे सेवन केल्याने हृदयाच्या आजारापासून स्वत:चा बचाव करू शकता.
8 वेदना - हात, पाय आणि स्नायू ताणतात आणि दुखतात त्यावेळी पारिजातकाच्या पानांचा रसाला समप्रमाणात आल्याच्या रसात मिसळून प्यायल्याने फायदे होतात.
9 दमा - श्वसनाशी निगडित आजारात पारिजातकाची सालींची भुकटी बनवून नागवेलीच्या पानांत टाकून खाल्ल्याने फायदेशीर असतं. याचा वापर सकाळ आणि संध्याकाळी केला जाऊ शकतो.
10 प्रतिकारक क्षमता - पारिजातकाच्या पानांचा रस किंवा याचा चहा बनवून नियमाने प्यायल्याने शरीराची रोग प्रतिकारक शक्ती वाढते आणि शरीर सर्व प्रकारांच्या आजाराशी लढण्यास सक्षम बनतं. या व्यतिरिक्त पोटात जंत होणं, टक्कल पडणं, बायकांच्या आजारामध्ये देखील फायदेशीर असतं.