उन्हाळ्याचा खरा मित्र गुलकंद, हे 5 फायदे आपल्याला फार कामी येतील
बुधवार, 27 मे 2020 (08:25 IST)
गुलाबाच्या ताज्या पाकळ्या आणि खडीसाखर मिसळून तयार केलेले गुलकंद. चवीला तर चविष्ट असतच पण आरोग्यासाठी देखील फायदेशीर असतं. गुलकंदाचे फायदे जाणून घेतल्यावर आपण आज पासूनच ह्याचे नियमाने सेवन करणार.
1 गुलकंद शरीरातील अवयवांना थंडावा देण्याचे काम करतं. शरीराची उष्णता वाढल्यावर गुलकंद घेणे लाभकारी असतं. उन्हाळ्या पासून होणाऱ्या त्रासांपासून सुटका होते.
2 गुलकंदाचे नियमाने सेवन करणे मेंदूसाठी देखील फायदेशीर असतं. 1 चमचा गुलकंद सकाळ आणि संध्याकाळ खाल्ल्याने आपला मेंदू शांत राहील, मेंदूला तवाका मिळेल, आपला राग देखील नाहीसा होईल.
3 बद्धकोष्ठता आणि अपचनाचा त्रास झाल्यास हे रामबाण आहे. दररोज गुलकंद घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास नाहीसा होतो. आपली भूक वाढवतो त्याच बरोबर पचन प्रणालीला सुधारण्यास मदत करते. गरोदरपणात हे लाभदायक आणि सुरक्षित आहे.
4 डोळ्यांचे तेज वाढविण्यासाठी आणि डोळ्यांना थंडावा मिळण्यासाठी गुलकंदाचे नियमाने सेवन केले पाहिजे. डोळ्यांची जळजळ, आणि डोळे येणे या त्रासापासून सुटका मिळवून देतं.
5 तोंड येणे (छाले होणे) आणि त्वचेच्या त्रासांवर गुलकंद फायदेशीर असतं. थकवा आणि शक्तीचा ह्रास जाणवत असल्यास गुलकंद फायदेशीर ठरतं.