पाकिस्तानात साखरेचे भाव गगनाला भिडले

मंगळवार, 11 फेब्रुवारी 2020 (10:52 IST)
इस्लामाबाद- पाकिस्तानमध्ये महागाईने सर्वसामान्य जनतेची कंबर मोडली आहे. दैनंदिन गरजेच्या वस्तू मोठ्या प्रमाणात महाग झाल्यामुळे मागील काळातील महागाईचे सर्व  रेकॉर्ड तुटत आहे.
 
या आर्थिक स्थितीकडे लक्ष घालत पाकिस्तानाचे पंतप्रधान इम्रान खान यांनी सरकार यासाठी प्रयत्नशील असल्याचं ट्विट केले आहे. खाद्य पदार्थ दर कमी करण्यात येतील असा आश्वासन सरकारद्वारे देण्यात येत आहे.
 
पाकिस्तानमध्ये काही शहरांमध्ये साखर दर 80 रुपये किलो तर गव्हाचे पीठ 70 रुपये किलो पर्यंत पोहचली आहे. साखर 100 रुपये असा दर गाठू शकते असे देखील सांगण्यात येत आहे.
 
यावर कॅबिनेट बैठकीत खाद पदार्थांचे दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात येईल, तसेच वाढलेल्या दरांची चौकशी करण्यास सुरुवात केली संबंधित कारवाई केली जाईल, असे इम्रान खान सरकार द्वारे सांगण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती