तसेच प्राण्यांवरील क्रूरता आणि अत्याचार रोखण्यासाठी आणि प्राण्यांच्या कल्याणाची आणि अधिकारांची जाणीव करून देण्यासाठी दरवर्षी 4 ऑक्टोबरला जागतिक प्राणी कल्याण दिन आंतरराष्ट्रीय स्तरावर साजरा केला जातो. जागतिक प्राणी दिन प्रथम 4 ऑक्टोबर 1929 रोजी साजरा करण्यात आला, ज्याची सुरुवात जर्मन लेखक आणि प्रकाशक हेनरिक झिमरमन यांनी प्राणी कल्याणाविषयी जागरुकता वाढवण्यासाठी केली.