Panjriri Recipe : जन्माष्टमीला नैवेद्यासाठी पंजीरी बनवा, साहित्य आणि कृती जाणून या

सोमवार, 26 ऑगस्ट 2024 (08:27 IST)
जन्माष्टमीला आपल्या लाडक्या गोपाळ कृष्णासाठी बनवा पंजिरी चला तर मग साहित्य आणि कृती जाणून घेऊ या.
साहित्य- 
हे करण्यासाठी तुम्हाला 1 कप धणे,1/2 कप साखर पावडर,1/2 कप बारीक चिरलेले बदाम, 1/2 कप बारीक चिरलेले काजू, 1 टेबलस्पून बेदाणे, 1/2 कप किसलेले खोबरे, 1 मोठे चमचे तूप, 1/2 कप मखाणे  आणि 1/2 टीस्पून वेलची 
 
कृती- 
सर्व प्रथम कढईत तूप गरम करा. चिरलेले काजू आणि बदाम घालून चांगले परतून घ्या. नंतर ते पॅनमधून वेगळे करा. नंतर त्याच कढईत मखाणे तळून घ्या. यानंतर मखाणे बाहेर काढून तूप घालून धणे पूड 10 मिनिटे चांगली परतून घ्या. त्यातून सुगंध येऊ लागला की गॅस बंद करा. आता त्यात भाजलेले मखाणे, काजू, बदाम, बेदाणे, वेलची पावडर आणि साखर पावडर घालून मिक्स करा. नंतर मंद आचेवर ठेवा आणि हलवा, नंतर 2 मिनिटांनी गॅस बंद करा. आता नैवेद्यासाठी पंजिरी तयार आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती