Gopal Kala जन्माष्टमी विशेष गोपाळकाला

बुधवार, 6 सप्टेंबर 2023 (11:44 IST)
Gopal Kala कृष्ण जयंतीचा उत्सवासाठी तयार केल्या जाणाऱ्या विशिष्ट प्रसादास गोपालकाला असे म्हणतात. दहीहंडी आणि कृष्णजन्माष्टमी यांच्या निमित्ताने हा प्रसाद तयार केला जातो. श्रीकृष्णजयंती व्यतिरिक्त वर्षभरात जेव्हाजेव्हा काल्याचे कीर्तन होते तेव्हा तेव्हा त्या कीर्तनानंतर गोपालकाला होतो. म्हणूनच त्या कीर्तनाला "काल्याचे" कीर्तन म्हणतात. ज्ञानेश्वरीचे किंवा दासबोधाचे पारायण, किंवा अनेक दिवस चालणाऱ्या अशाच एखाद्या ग्रंथवाचनानंतर, अथवा कीर्तन महोत्सवामध्ये शेवटच्या दिवशी काल्याचे कीर्तन होते. वारकरी संप्रदायात वारीची सांगता गोपाळकाला करूनच होते.
 
गोपाळकाला
गोपाल म्हणजे गायींचे पालन करणारा. काला म्हणजे एकत्र मिसळणे. पोहे, ज्वारीच्या लाह्या, धानाच्या लाह्या, लिंबाचे वा आंब्याचे लोणचे, दही, ताक, चण्याची भिजविलेली डाळ, साखर, फळांच्या फोडी इत्यादी मिसळून तयार झालेला हा एक खाद्यपदार्थ असतो. हा कृष्णास फार प्रिय होता, असे सांगितले जाते. श्रीकृष्ण व त्याचे सवंगडी मिळून यमुनेच्या तीरावर हा तयार करीत असत व सर्वजण वाटून खात असत असे मानले जाते. जाणून घ्या कशा प्रकारे तयार करावा गोपाळकाला
 
एक वाटी धानाच्या लाह्या, 1 वाटी काल्याच्या लाह्या, एक वाटी जाड पोहे, 1 काकडी, 2-3 हिरव्या मिरच्या, अर्धा चमचा किसलेलं आलं, एक चमचा लिंबू रस, दोन चमचे बेदाणे, 50 ग्राम दही, 50 ग्राम भाजके डाळे, एक चमचा लिंबाचे गोड लोणचे, एक चमचा आंब्याचे गोड लोणचे, 1 चमचा साखर, चवीप्रमाणे मीठ, कोथिंबीर चिरलेली, दोन चमचे डाळींबाचे दाणे

कृती: वरील सर्व साहित्य एकत्र करावं. मग त्यात थोडे डाळिंबाचे दाणे आणि कोथिंबीर पुन्हा वरून घालावी.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती