Dates Fruit Benefits : खारकेचे 10 फायदे

गुरूवार, 5 ऑक्टोबर 2023 (22:27 IST)
आपणास माहीत आहे का, खारीक आणि खजूर एकाच झाडांपासून तयार होतं. दोघांची प्रकृती उष्ण असते. दोन्ही शरीरास बळकट बनविण्यासाठी विशेष भूमिका बजावतात. उष्ण प्रकृतीच्या असल्यामुळे हिवाळ्यात त्यांची उपयुक्तता वाढते. चला, तर मग जाणून घेऊया खारकेचे हे अद्वितीय फायदे.
 
1 मासिक पाळी : हिवाळ्यात बऱ्याच बायकांना मासिक पाळीशी निगडित काही त्रास उद्भवतात, त्यासाठी खारीक फायदेशीर आहे. खारीक खाल्ल्याने मासिक पाळी मोकळी होते आणि कंबर दुखी मध्ये देखील आराम मिळतो.
 
2 झोपेत लघवी होणे : खारीक खाल्ल्याने लघवीचा आजार बरा होतो. म्हातारपणात लघवी वारंवार येत असल्यास तर दिवसातून 2 
खारीक खाणे फायदेशीर असतं. खारीक घातलेले दूध घेणे देखील फायदेशीर असणार. आपले मुलं झोपेत बिछान्यावरच लघवी करतं असल्यास त्याला देखील रात्री खारकेचं दूध द्या. हे शक्ती देतं.
 
3 रक्तदाब : कमी रक्तदाब असणारे रुग्ण 3 - 4 खारका किंवा खजूर कोमट पाण्यामध्ये धुऊन बियाणं काढून टाका. हे गायीच्या गरम दुधात उकळवून घ्या. या उकळलेल्या दुधाला सकाळ-संध्याकाळ प्या. काहीच दिवसात कमी रक्तदाबाचा त्रास दूर होईल.
 
4 दात गळणे : खारीक खाऊन गरम दूध प्यायल्याने कॅल्शियमच्या कमतरतेमुळे होणारे आजार जसं दात कमकुवत होणं, हाडांचे गळणं इत्यादी थांबतात.
 
5 बद्धकोष्ठता : सकाळ - संध्याकाळ तीन खारका खाऊन वरून गरम पाणी प्यायल्याने बद्धकोष्ठता दूर होते. खारकेचं किंवा खजुराचं लोणचं जेवताना घेतल्याने अपचन होत नाही आणि तोंडाची चवही चांगली राहते. खारकेचं किंवा खजुराचं लोणचं बनवायची विधी जरा अवघड आहे, म्हणून तयार केलेलं लोणचं घ्यावं.
 
6 मधुमेह : मधुमेहाचे रुग्ण ज्यांना मिठाई, साखर इत्यादी प्रतिबंधित आहे, ते लोकं मर्यादित प्रमाणात खारकेचा शिरा घेऊ शकतात. खारकेत किंवा खजुरात ते अवगुण नाही जे उसाच्या साखरेत आढळतात.
 
7 जुन्या जखमा : जुन्या जखमांसाठी खारकेचं किंवा खजुराचं बियाणं जाळून त्याची भुकटी बनवून जखमांवर लावल्याने जखम लवकर भरते.
 
8 डोळ्यांचे आजार : खारकेच्या किंवा खजुराच्या बियाणंच सुरमा डोळ्यात घातल्याने डोळ्यांचे आजार दूर होतात.
 
9 खोकला : खारकेला तुपात भाजून दिवसातून 2 ते 3 वेळा सेवन केल्याने खोकला, शिंक, सर्दी, कफ कमी होतो.
 
10 ऊ : खारकेचं किंवा खजुराच्या बियाणं पाण्यामध्ये उगाळून डोक्यात लावल्याने डोक्यातील उवांचा नायनाट होतो.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती