डोळ्यांची दृष्टी चांगली होण्यासाठी आपल्या दैनंदिनीमध्ये काही व्यायाम करावे. जेणे करून डोळे निरोगी आणि सुंदर दिसतील.
1 पापण्यांची उघडझाप करा. या प्रमाणे तर आपण प्रत्येक चार सेकंदावर पापण्यांची उघडझाप करतो. परंतु वेगाने किमान 10 वेळा पापण्या उघडझाप करा. असं केल्याने डोळ्याचा ताण आणि थकवा नाहीसा होईल.
2 डोळ्यांना एक सेकंद घट्ट बंद करा आणि सोडा. डोळ्याच्या त्वचेवर हळुवार बोटांनी मॉलिश करा. असं केल्याने डोळ्याच्या भोवती सुरकुत्या येणार नाही.
3 डोळ्यांच्या बाहुल्या वर्तुळाकार फिरवा. या मुळे स्नायूंचा चांगला व्यायाम होतो. दोन्ही दिशेला हा व्यायाम तीन तीन वेळा करा.
4 डोळ्यांच्या भुभुळ किंवा बाहुल्या फिरवून चौरस बनवा हाताला डोळ्यावर ठेवणे डोळ्यांना आराम देण्याचा उत्तम मार्ग आहे.
5 उजवा हात पुढच्या दिशेने पसरवून खांद्यापर्यंत न्यावे. हात फिरवा आणि डोळ्याने हाताकडे बघत राहा. डाव्या हाताने देखील असेच करा. दिवसातून एकदा तरी हा व्यायाम करावा.